ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

उद्धव ठाकरेंची बड्या निष्ठावंताने सोडली साथ:वाशिमच्या सुरेश मापारी यांचा भाजपत प्रवेश; रवींद्र चव्हाण यांनी केले भाजपमध्ये स्वागत

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वाशिम जिल्ह्यात जबर झटका बसला आहे. ठाकरे गटाचे येथील माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी आज आपले शिवबंधन सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांचे 250 हून अधिक कार्यकर्त्यांनीही भाजपचे कमळ हातात धरले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. सुरेश मापारी यांनी दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू होती. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावून त्यांचे मतही जाणून घेतले होते. त्यानंतर त्यांनी अपेक्षेनुसार भाजपत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ते शनिवारी रात्रीच आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह मुंबईच्या दिशेने निघाले. आज मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांनी भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हाती घेतली. त्यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला वाशिममध्ये मोठा झटका बसला आहे. खासदार संजय देशमुख यांच्याशी होते मतभेद सुरेश मापारी यांचे ठाकरे गटाचे स्थानिक खासदार संजय देशमुख यांच्याशी तीव्र मतभेद होते. त्यांनी अनेकदा संजय देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. पक्षश्रेष्ठींच्या कानावरही त्यांनी ही गोष्ट घातली होती. पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत आपली वेगळी वाट निवडण्याचा निर्णय घेतला. ठाकरे गटाने कुणकुण लागताच केली होती कारवाई उल्लेखनीय बाब म्हणजे सुरेश मापारी भाजपमध्ये जाणार असल्याची कुणकुण ठाकरे गटाला यापूर्वीच लागली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गटाने सुरेश मापारी यांच्याकडील जिल्हाप्रमुख पदाची सूत्रे काढून घेतली होती. त्यानंतर ती सूत्रे बालाजी वानखेडे यांच्याकडे सोपवली होती. त्यावर मापारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर लगेचच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. कोण आहेत सुरेश मापारी? सुरेश मापारी हे वाशिम जिल्ह्यातील एक बडे नेते मानले जातात. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य, अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यासारखी अनेक महत्वाची पदे सांभाळली आहेत. वाशिमच्या ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे मोठे जाळे त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये याचा मोठा धक्का ठाकरे गटाला बसेल असा दावा केला जात आहे. हे ही वाचा… एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर:केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेणार भेट; राज्याच्या राजकारणात काय घडणार? सर्वांना उत्सुकता सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेत. ते तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीचे नेमके कारण समजू शकले नाही, पण ही भेट विधान परिषदेच्या निवडणुकीतील जागावाटप व जागांची अदलाबदली या भोवती फिरती राहणार असल्याचा अंदाज आहे. विशेषतः ऑपरेशन टायगरवर या भेटीत चर्चा होईल काय? असाही प्रश्न या निमित्ताने चर्चिला जात आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर