ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांच्या कार्याला उजाळा:सेवानिवृत्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी |अकोला जिल्हातील जिल्हा परिषद शाळेमधून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सेवानिवृत्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा ताजनापेठ येथे करण्यात आले. सेवानिवृत्त केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर मांडेकर यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सेवानिवृत्त केंद्रप्रमुख अजय बांडी होते. प्रमुख अतिथी म्हणून सतिश दोडके, प्रकाश चतरकर, रजनिश ठाकरे, राजेश देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत गायकवाड, मो. अथर परवेज मो. हुसेन, धनराज आंबेकर, भास्कर पातुर्डे, सुधाकर कुचर, मधुसुदन घावट, राजकन्या सावळे, वंदना पिंपळे, तनविर फिरदोस, सतीश देशमुख यांचा सेवानिवृत्तनिमित्त शाल श्रीफळ देवून यथोचित सन्मान केला. मुकंद देशमुख, गजानन काळे, गोकुळ कलंत्री कार्यक्रमाची धुरा सांभाळली. या वेळी सेवानिवृत्त मंडळीनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शैक्षणिक क्षेत्राची प्रतिमा उंचावणे, शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी – समस्या दूर करण्यासाठी कार्य प्रयत्न करू. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचा प्रचंड प्रत्यक्ष अनुभवाचा फायदा पुढील पिढीला होण्याकरीता प्रयत्नशिल राहू, असेही ते म्हणाले. आयोजक ज्ञानेश्वर मांडेकर यांनी प्रास्तविकातून जिल्हातील सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षकांच्या समस्यावर प्रकाशझोत टाकला. सेवानिवृत्त बांधवानी कर्तव्याचा भाग म्हणून शैक्षणिक क्षेत्रात क्रियाशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक अजहरउद्दीन केले. शाळेचे मुख्याध्यापक जव्वाद हुसेन यांनी आभार मानले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर