ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

नाइट लँडींग…विमानतळाच्या दक्षिणोत्तर भागात 50 एकर जमीन संपादित करणार:पालकमंत्री गोरे यांचा ॲक्शन प्लॅन तयार, अतिक्रमणेही काढणार

5 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर विमानतळावर नाइटलँडींग सुरू करण्यासाठी दक्षिणोत्तर दिशेने 50 एकर जमीन आवश्यक आहे. भारतीय विमानसेवा प्राधिकरणाची मालकी असलेल्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली. महिन्याभरात त्या हटवण्याची मोहीम हाती घेण्यात येईल. त्यानंतर काही जमिनी संपादित करून नाइटलँडींगचे काम सुरू होईल, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. त्याचा ‘ॲक्शन प्लॅन’ही तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. होटगी रस्त्यावरील विमानतळावर नाइट लँडींग नसल्याने रात्रीची सेवा मिळत नाही. सूर्यास्ताच्या आतच लँडींग आणि टेक्ऑफ करावे लागते. प्रवाश्यांच्या सोयीसाठी नाइट लँडींग आवश्यक असून, त्यासाठी धावपट्टीची लांबी वाढवावी लागेल. सध्याच्या धावपट्टीची लांबी दृश्यमानतेसाठी वाढवावी लागेल. त्यासाठी विमानतळाच्या दक्षिणोत्तर दिशेने अतिरिक्त जमीन मिळवावी लागेल. त्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आले. सध्या विमानतळावर 72 आसनी विमानेच सेवा देत आहेत. मुंबई, बंगळुरू येथील विमानतळांवर स्लॉट हवा असेल तर नाइट लँडिंग अत्यावश्यक आहे. तसेच अधिक आसन क्षमतेच्या विमानांसाठी धावपट्टीची लांबीही वाढवावी लागेल. त्यासाठी परिसरातील जमीन ताब्यात घेणे आवश्यक असल्याचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने म्हटले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन काम करणार आहे. मुंबई, बंगळुरू, तिरुपतीला सेवा देण्यासाठीच एअरपोर्ट विस्तार सकाळी 7 वाजता सोलापूरहून मुंबईला जाणारे आणि रात्री 8:30 वाजता सोलापूरला परत येणारे विमान सुरू व्हायचे असेल तर नाइट लँडींग आवश्यक आहे. बंगळुरू आणि तिरुपतीसाठीही विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. नाईट लँण्डींग नसल्याने अडचणी आहेत. जयकुमार गोरे, पालकमंत्री जिल्हा प्रशासन, महापालिका यांच्याकडून कारवाईच नाही एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाने विमानतळाच्या जागेवरील अतिक्रमणे काढण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार केला. मात्र अतिक्रमणे काढण्याचे काम महापालिकेचे असल्याचे सांगत जिल्हा प्रशासनाने ती जबाबदारी महापालिकेकडे ढकलली. या प्रशासकीय टोलवाटोलवीमुळे अतिक्रमणे काढण्याचे काम लटकले आहे.आता पालकमंत्र्यांच्या ॲक्शन प्लॅनमध्ये संयुक्त मोहीम आहे. मीटरपर्यंत गरजेची रात्रीच्या वेळी विमान उतरवण्यासाठी धावपट्टीची लांबी कमीत कमी 800 ते 900 मीटर असावी लागते. सोलापूरच्या विमानतळावरील धावपट्टीची लांबी 2100 मीटर आहे. परंतु नाईटलँडींगसाठी धावपट्टीवर 5,000 मीटरपर्यंतची दृश्यमानता आवश्यक असते. जी सोलापूरच्या विमानतळावर नाही. धावपट्टीची लांबी पुरेशी असूनही चालणार नाही. रात्री विमान सुरक्षितपणे उतरण्यासाठी अप्रोच लाइट्स सिस्टीम, टचडाउन झोन लाइट्स आणि इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम यांसारख्या प्रगत प्रकाश व्यवस्थांची सुविधा धावपट्टीवर असणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठीच 50 एकर जमीन आवश्यक.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर