ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक:संदीप कोतकरांच्या BJP प्रवेशाच्या चर्चा, संख्याबळात भाजप नंबर वन, तरीही जागा राखण्यासाठी राष्ट्रवादीचा दावा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद जागेसाठी महायुतीमध्ये तीव्र रस्सीखेच सुरू झाली आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये दिवंगत अरुण जगताप यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर वर्चस्व राखले होते, त्यामुळे राष्ट्रवादी या जागेवर आपला मूळ दावा सांगत आहे. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे सध्या अस्तित्वात असलेल्या एकूण 461 मतदारांपैकी सर्वाधिक 199 नगरसेवक भाजपचे आहेत. या संख्याबळाच्या जोरावर भाजपने आणि राजकीय समतोलाचा दाखला देत शिंदे यांच्या शिवसेनेनेही या जागेवर दावा ठोकला आहे. माजी महापौर संदीप कोतकर, शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे आणि क्षितीज घुले यांसारख्या बड्या चेहऱ्यांची नावे चर्चेत आल्याने चुरस कमालीची वाढली आहे. संदीप कोतकर हे भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नेमके आता कोणाला उमेदवारी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात भाजप-राष्ट्रवादीचे 4 आमदार मात्र, दरम्यानच्या काळात‎ जिल्ह्यात झालेल्या महापालिका व‎ नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपच्या‎ सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत.‎त्यामुळे भाजपकडून या जागेसाठी‎आग्रह सुरू झाला आहे. राष्ट्रवादी व‎भाजपात या जागेवरून रस्सीखेच सुरू‎असतानाच आता शिंदेच्या शिवसेनेनेही ‎या जागेवर संधी मिळावी, अशी मागणी‎पुढे केली आहे.जिल्ह्यात भाजप व‎ राष्ट्रवादीचे प्रत्येकी 4 आमदार‎ आहेत.तसेच, विधान परिषदेतही ‎जिल्ह्यातून भाजप व राष्ट्रवादीच्या‎ नेत्यांना संधी मिळालेली आहे. त्यामुळे ‎शिवसेनेला संधी देऊन राजकीय‎ समतोल राखला जावा, असा दावा‎ केला जात आहे.‎ राष्ट्रवादीला जागा मिळाली तरीही भाजपवरच मदार‎ विधान परिषदेच्या राज्यातील 17 जागांसाठी निवडणूक होत असून‎ त्यासाठी अपवाद वगळता महायुतीत सर्वच जागांवर रस्सीखेच सुरू‎ आहे. तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्रितपणे जागा वाटपाचा निर्णय घेणार‎ आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या दोन निवडणुकांपासून राष्ट्रवादी‎ काँग्रेसकडे असलेली जागा याही वेळेस भाजपने औदार्य दाखवून‎ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली, तरीही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची‎ मदार भाजपवरच असणार आहे. जिल्ह्यात भाजपचे नगरसेवक ‎सर्वाधिक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निश्चितीमध्येही‎ भाजपची व पर्यायाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका ‎महत्वाची असणार आहे.‎ मतदारांमध्ये भाजपचे सर्वाधिक‎
199, राष्ट्रवादीचे 50 नगरसेवक‎ जिल्ह्यात महापालिका, नगरपालिका व नगर पंचायतींमध्ये महायुतीचे‎वर्चस्व आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या एकूण 461 मतदारांमध्ये‎सर्वाधिक 199 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आहेत. राष्ट्रवादी ‎काँग्रेस अजित पवार गटाचे 50, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 35,‎ शिवसेना शिंदे गटाचे 48, काँग्रेसचे 29, तर इतर पक्ष व अपक्ष असे 100 नगरसेवक आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर