ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

पंतप्रधान आवास योजना:घरकुलासाठी नदीपात्रातील पूर्ण साठ्याच्या 10% वाळू मोफत, राज्यात 1.77 लाख कोटींची गुंतवणूक, 12 लाख घरांचे बांधकाम मार्गी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील नदीपात्रात उपलब्ध असलेल्या एकूण वाळू साठ्यापैकी १० टक्के वाळू आता पंतप्रधान घरकुल योजनेतील घरांच्या बांधकामासाठी मोफत दिली जाणार आहे. राज्य सरकारने १५ मे रोजी हा नवा आदेश जारी केला असून, यामुळे राज्यातील १२ लाख घरांच्या रखडलेल्या व सुरू असलेल्या बांधकामांना गती मिळणार आहे. राज्यात वाळू टंचाई आणि धोरणातील सततच्या बदलांमुळे पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना बांधकामासाठी वाळू मिळण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. यावर तोडगा काढत राज्य सरकारने वाळू लिलाव धोरणात बदल केला आहे. यापूर्वी केवळ उत्खनन केलेल्या वाळूतील १० टक्के वाळू देण्याची अट होती, मात्र आता संपूर्ण नदीपात्रातील साठ्याच्या १० टक्के वाळू घरकुलांसाठी आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी मोफत देणे लिलावधारकांना बंधनकारक करण्यात आले आहे. नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये घरकुल लाभार्थ्यांची संख्या मोठी असल्याने सर्व लाभार्थ्यांना वेळेत वाळू मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. १३ लाख घरांपैकी १० लाख पूर्णत्वास राज्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एकूण १३ लाख ५६ हजार ८३५ घरकूल मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी १२ लाख १ हजार ६४३ घरांचे काम सध्या सुरू असून, सुमारे १० लाख ६४ हजार ५५ घरे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. नदीपात्रातील साठ्यातूनही वाळू मोफत मिळणार असल्याने या कामांना वेग येईल. योजनेवर केंद्र सरकारने महाराष्ट्राला १ लाख ७७ हजार १२२.८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. घरकुल ः पुण्यात सर्वाधिक पुणे१,५०,०७७
नाशिक ५३,६७५
कल्याण-डोंबिवली ४६,३९२
सोलापूर ३७,१४२
नागपूर ३१,९३३
नवी मुंबई २७,०७३
छत्रपती संभाजीनगर २४,४६४
जळगाव १२,१०१
अहिल्यानगर १०,३९४
अमरावती १२,१४७

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर