ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

काॅर्पोरेट जिहाद:निदाचा आश्रयदाता नगरसेवक मतीन पटेल पोलिसांना साेमवारी शरण येणार, कोणतीही पळवाट न उरल्याने शरण यावेच लागणार

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिकमधील ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणाचे थेट कनेक्शन आता छत्रपती संभाजीनगरशी जोडले गेले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला पोलिसांपासून वाचवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याप्रकरणी, एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याच्याभोवती पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. गुन्हे शाखेने कायदेशीर नोटीस बजावल्यानंतर कोणतीही पळवाट न उरल्याने, सोमवारी ( २५ मे) पटेल स्वतःहून नाशिक पोलिसांसमोर शरण येणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मतीन पटेल याच्याविरुद्ध आरोपीला बेकायदेशीरपणे आश्रय दिल्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईअंतर्गत पटेलला शोधण्यासाठी नाशिक पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले होते, मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नाही. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत नाशिक रोड न्यायालयात मतीन पटेल, निदा खान आणि इतर चार संशयितांविरुद्ध सविस्तर दोषारोपपत्र दाखल केले आहे. दोषारोपपत्र दाखल होताच गुन्हे शाखेच्या पथकाने पटेलला थेट नोटीस बजावली, ज्यामुळे त्याने नरमाईची भूमिका घेत पोलिसांसमोर हजर होण्याची तयारी दर्शवली असल्याचे सूत्रांकडून कळते. आधी ‘पाहुणचार’, आता नोटिसीचा दणका या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला जेव्हा छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली होती, तेव्हा पोलिसांच्या पथकाने नगरसेवक मतीन पटेल यालाही ताब्यात घेतले होते. त्या वेळी त्याची कसून चौकशी करत पोलिसांनी त्याचा यथोचित ‘पाहुणचार’ केला होता. मात्र, त्या क्षणी त्याच्यावर रीतसर गुन्हा दाखल नसल्याने आणि थेट अटक केल्यास त्याला लगेच जामीन मिळण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्याला सोडून दिले होते. आता मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून थेट नोटीस बजावल्याने त्याला स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन व्हावे लागणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर