ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

साकोऱ्यात रात्रीत 7 घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास‎:पाच वर्षांनंतर पुन्हा‎ घरफोड्यांची मालिका‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे शनिवारी मध्यरात्री‎अज्ञात चोरट्यांनी एकाच परिसरातील सात घरे फोडून‎रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखो‎रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना‎घडली. पाच वर्षांपूर्वी याच भागात झालेल्या‎घरफोड्यांच्या मालिकेची ही पुनरावृत्ती मानली जात‎असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.‎ माहितीनुसार, उन्हाळ्यामुळे अनेक कुटुंबीय घरांना‎कुलूप लावून गच्चीवर झोपले होते. याच संधीचा फायदा‎घेत चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी श्रीराम‎मंदिरालगतच्या रोहिदास गल्लीतील देवबा ठाकरे,‎विजय ठाकरे, चिंधा ठाकरे तसेच राजवाडा‎परिसरातील व्यंकट निकम, कल्याबाई निकम, विजय निकम‎यांच्या घरांचे कडी-कोयंडे तोडून‎घरफोडी केली. तसेच हेमंत निकम‎यांच्या घराच्या मागील बाजूची‎खिडकी काढून घरात प्रवेश‎करण्याचा प्रयत्न करण्यात आला.‎ मात्र घरातील सदस्य जागे‎ असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी‎तेथून पळ काढला. देवबा ठाकरे‎आणि विजय ठाकरे सकाळी घरात‎आले असता घरातील सामान‎ अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.‎ बाहेरगावी गेलेले इतर घरमालक घरी‎परतल्यानंतर त्यांच्या घरांतील रोख‎ रक्कम व दागिने चोरीला गेल्याचे‎समोर आले. घटनेची माहिती‎ मिळताच पोलिसांनी घटनास्थळी‎ धाव घेत पाहणी केली. दुपारी‎श्वानपथकानेही घटनास्थळी भेट देत‎तपासासाठी सुगावा घेतला.‎याप्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात‎अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा‎दाखल करण्यात आला असून‎पुढील तपास सुरू आहे.‎ पाच वर्षांनंतर पुन्हा‎घरफोड्यांची मालिका‎ साकोरा येथे पाच वर्षांच्या अंतराने‎पुन्हा एकाच परिसरातील अनेक‎घरांवर घरफोड्यांची मालिका‎घडल्याने ग्रामीण भागातील‎सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.‎पूर्वीच्या घरफोडीतील आरोपी‎अद्याप सापडले नसताना नव्याने‎सात घरे फोडली गेल्याने‎पोलिसांच्या तपास आणि‎प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रश्न‎उपस्थित होत आहेत.‎ घरातील कपाट उचलून नेले शेतात‎ चोरट्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर काही वस्तू व कपाटे त्यांना खोलता ‎आली नाहीत. त्यामुळे चोरट्यांनी घरातील कपाटे थेट उचलून शेतात नेली व‎दगडाने फोडून त्यातील सुमारे ५० हजार रुपये रोख रक्कम तसेच‎सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याचे उघड झाले.‎ मार्कंडेय पर्वतावर सुरक्षेसाठी तैनात बंदोबस्त‎‎ कळवण | तालुक्यातील प्रसिद्ध मार्कंडेय पर्वतावर सोमवती अमावस्येनिमित्त‎भरविण्यात येणारी मार्कंडेय ऋषी यात्रा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात‎आली असून भाविकांना पर्वतावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.‎सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संखे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले‎असून भाविकांसाठी पहिल्या पायरीवर दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर