ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

शरद पवारांपेक्षा पार्थ पवार अधिक श्रीमंत:संपत्तीच्या बाबतीत नातू पुढे; पवार घराण्यातील दोन पिढ्या संसदेत, दोघेही बिनविरोध विजयी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रातील आगामी राज्यसभेच्या निवडणुकीत राज्यातील सातही जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत पवार कुटुंबातील दोन पिढ्यांची एकाच वेळी राज्यसभेत एन्ट्री झाल्याने राजकीय वर्तुळात विशेष चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी निवडून आले आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे महायुतीकडून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे आजोबा आणि नातू अशा दोन पिढ्या एकाच वेळी संसदेत पोहोचल्याने हा प्रसंग राज्याच्या राजकारणात विशेष ठरला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी 6 मार्च रोजी या दोन्ही नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल केले होते. उमेदवारी अर्जासोबत निवडणूक नियमांनुसार उमेदवारांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील असलेले प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार दोघांनीही आपल्या संपत्तीचा तपशील निवडणूक आयोगाकडे दिला. या प्रतिज्ञापत्रांवर नजर टाकल्यास पार्थ पवार यांची एकूण मालमत्ता त्यांच्या आजोबा शरद पवार यांच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे राजकीय चर्चेसोबतच त्यांच्या संपत्तीच्या आकडेवारीचीही चर्चा सुरू झाली आहे. शरद व प्रतिभा पवारांकडे 60 कोटी 71 लाख रुपयांची मालमत्ता प्रतिज्ञापत्रानुसार शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावावर एकूण सुमारे 60 कोटी 71 लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यामध्ये 44 कोटी 72 लाख रुपयांची जंगम मालमत्ता समाविष्ट आहे. त्यांच्या नावावर सुमारे 1 लाख 25 हजार रुपये रोख रक्कम आहे. बँका आणि वित्तसंस्थांमधील मुदत ठेवींची रक्कम 11 कोटी 66 लाख रुपयांच्या आसपास आहे. याशिवाय समभाग, म्युच्युअल फंड यांसारख्या गुंतवणुकीत सुमारे 27 कोटी रुपयांची रक्कम आहे. सोने-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंची किंमत जवळपास 3 कोटी 85 लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. स्थावर मालमत्तेमध्ये बारामतीतील शेती, घर आणि सदनिका यांचे सध्याचे अंदाजे मूल्य 15 कोटी 99 लाख रुपये असल्याचे सांगितले आहे. तसेच सुप्रिया एंटरप्रायजेसचे सुमारे 49 लाख 84 हजार रुपयांचे दायित्वही त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. पार्थ पवारांच्या नावावर 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता दुसरीकडे पार्थ पवार यांच्या प्रतिज्ञापत्रात एकूण मालमत्ता 88 कोटी 33 लाख रुपये असल्याचे नमूद केले आहे. त्यामध्ये 11 कोटी 35 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. बँका, टपाल विभाग, विमा आणि इतर वित्तीय संस्थांमधील मुदत ठेवींची रक्कम 3 कोटी 68 लाख रुपये असल्याचे सांगितले आहे. समभाग आणि म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक सुमारे 1 कोटी 17 लाख रुपये आहे. सोने-चांदीच्या दागिन्यांची किंमत सुमारे 1 कोटी 31 लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. स्थावर मालमत्तेमध्ये बारामती तालुक्यातील शेतजमिनी आणि पुण्यातील घर यांचे एकत्रित अंदाजे मूल्य 76 कोटी 98 लाख रुपये आहे. तसेच बँका आणि वित्तीय संस्थांचे सुमारे 92 लाख 48 हजार रुपयांचे कर्ज असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. पवार कुटुंबातील दोन पिढ्या एकाच वेळी राज्यसभेत या निवडणुकीमुळे पवार कुटुंबातील दोन पिढ्या एकाच वेळी राज्यसभेत पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे दीर्घ राजकीय अनुभव असलेले शरद पवार तर दुसरीकडे नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे पार्थ पवार अशी ही राजकीय जोडी संसदेत जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात या दोघांची भूमिका कशी राहते, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर