ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

‘तुकाराम मुंढेंचे रक्त काढून सर्व खातेप्रमुखांना द्या’:माजी मंत्री सुबोध सावजींची मुख्य सचिवांकडे अनोखी मागणी, काय म्हणाले सावजी?

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून हा विभाग पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आला असून, गेल्या महिनाभरात अवैध गुटखा विक्रेते, अन्नपदार्थांत भेसळ करणारे, तसेच हॉटेल आणि मेडिकल व्यावसायिकांवर कारवाईचा धडाकाच लावण्यात आला आहे. मुंढे यांच्या या धडक कारवाईमुळे गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, त्यांच्या या धडाकेबाज कार्यशैलीचे राज्यभरातून उत्स्फूर्त स्वागत होत आहे. याचाच प्रत्यय म्हणून काही शेतकऱ्यांनी चक्क त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत कृतज्ञता व्यक्त केली. तर दुसरीकडे, राज्याच्या एका माजी मंत्र्यांनीही मुंढे यांच्या या कामगिरीचे अनोख्या शैलीत कौतुक करत आता एक वेगळीच मागणी केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नेते आणि राज्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना पत्र पाठवून एक अत्यंत अनोखी आणि मार्मिक मागणी केली आहे. तुकाराम मुंढे यांच्या कठोर कारवाईमुळे सध्या राज्यातील भ्रष्टाचारी आणि भेसळखोरांचे धाबे दणाणले असून, त्यांच्याप्रमाणेच इतर सर्व खातेप्रमुखांनीही कर्तव्यदक्षतेने काम करावे अशी जनतेची अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे घडत नसल्याची खंत व्यक्त करत, इतर अधिकाऱ्यांमध्येही अशीच धडक कार्यक्षमता निर्माण व्हावी यासाठी चक्क ‘तुकाराम मुंढे यांचे एक बाटली रक्त काढून ते आपणासह राज्यातील सर्व खातेप्रमुखांना थोडे-थोडे देण्यात यावे’, अशी उपहासात्मक आणि हटके मागणी सुबोध सावजी यांनी या पत्राद्वारे केली आहे. तुकाराम मुंढे यांचे रक्त सर्व खाते प्रमुखांना द्यावे सुबोध सावजी म्हणाले, तुकाराम मुंढे यांचे एक बाटली रक्त काढून ते थोडे थोडे आपणांसह राज्यातील सर्व खाते प्रमुखांना द्यावे, जेणेकरून त्यांच्यासारखी काम करण्याची प्रेरणा व कार्यक्षमता निर्माण होऊन महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल. ज्याप्रमाणे अशक्त रुग्णाला रक्ताची बॉटल देऊन बरे करण्यात येत त्याचप्रमाणे तुकाराम मुंढे यांचे रक्त देऊन आपणासह सर्व राज्यातील खातेप्रमुखांना काम करण्याची शक्ती मिळेल. अशक्त रुग्णाला सशक्त रुग्णाचे रक्त देऊन बरे करण्यात येते. त्यामुळे, तुकाराम मुंढेंचं रक्त राज्यातील सर्वच शासकीय प्रमुखांना द्यावं, म्हणजे तुकाराम मुंढेंसारखं काम करण्याची प्रेरणा आणि शक्ती राज्यातील सर्वच विभागाच्या खातेप्रमुखांना मिळेल, असेही सुबोध सावजी यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर