ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अमरावतीत भाजपला दुहेरी धक्का:फडणवीसांचे मामेभाऊ विवेक कलोती, आमदार भारतीय यांचे बंधू पराभूत; काँग्रेस-स्वाभिमानचा विजय

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या टप्प्यातच राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. एकूण 87 जागांच्या अमरावती महापालिकेत काही प्रभागांचे निकाल हाती येताच वातावरण तापलं आहे. विशेषतः पहिल्याच फेरीत भाजपला दोन मोठे धक्के बसल्याने शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचे भाऊ तुषार भारतीय या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांचा पराभव झाला आहे. प्रभाग क्रमांक 14 मधील निकाल भाजपसाठी विशेष धक्कादायक ठरले आहेत. या प्रभागातून काँग्रेसने क्लीन स्वीप साधत चारही जागा जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांचा याच प्रभागात पराभव झाला आहे. काँग्रेसच्या विजयामुळे मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. फटाके, घोषणा आणि ढोल-ताशांच्या गजरात काँग्रेस समर्थकांनी या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन केलं. भाजपसाठी हा निकाल अनपेक्षित मानला जात असून, सुरुवातीच्या फेरीतच सत्ता समीकरणांवर परिणाम होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. प्रभाग क्रमांक 14 अ मधील निकालांचा तपशील पाहिला तर काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपवर स्पष्ट आघाडी घेतल्याचं दिसून येतं. विलास इंगोले यांनी भाजपचे अविनाश देऊळकर यांचा 12,217 विरुद्ध 4,934 मतांनी पराभव केला. सुनीता भेले यांनी संगीता बुरंगे यांचा 7,397 विरुद्ध 3,770 मतांनी पराभव केला. सुशीला रतावा यांनी गंगा खारकर यांच्यावर 8,625 विरुद्ध 5,956 मतांची आघाडी घेत विजय मिळवला. तर संजय शिरभाते यांनी भाजपचे विवेक कलोती यांचा 5,645 विरुद्ध 4,726 मतांनी पराभव करत भाजपला मोठा धक्का दिला आहे. आमदार श्रीकांत भारतीय यांचे भाऊ तुषार भारतीय पराभूत दुसरीकडे, साई नगर प्रभागातील निकालांनीही भाजपच्या अडचणी वाढवल्या आहेत. या प्रभागात भाजपचे नेते तुषार भारतीय यांचा पराभव झाला आहे. आमदार श्रीकांत भारतीय यांचे भाऊ असलेल्या तुषार भारतीय यांच्याकडून भाजपला मोठी अपेक्षा होती. मात्र रवी राणांचे निकटवर्तीय आणि युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सचिन भेंडे यांनी विजय मिळवत बाजी मारली आहे. साई नगरमधील ही निवडणूक आमदार रवी राणांनी प्रतिष्ठेची बनवली होती. त्यामुळे या निकालाला स्थानिक राजकारणात विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. काही प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढती या निवडणुकीत अमरावतीत राजकीय लढत बहुरंगी पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना, बसपा आणि युवा स्वाभिमान पार्टी यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि युनायटेड फोरम यांनी आघाडी करत निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी आणि समाजवादी पक्षाने काही जागांवर आघाडी करून उमेदवार दिले होते, तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काही प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढती लढवल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर