ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

तरुणीचा विनयभंग करून कुटुंबाला बेदम मारहाण:चौघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सेनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावातील एका 26 वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिला आणि तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून सेनगाव पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुरुवारी ता. 18 रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेलया एका गावातील तरुणी तिच्या घरासमोर उभी होती. यावेळी गावातील राहुल जाधव हा तरुणीच्या घरा समोर आला. तू माझ्याशी का बोलत नाहीस असे विचारले. त्यावर तरुणीने तुझ्यामुळे माझे लग्न मोडले आहे, त्यामुळे मी तुझ्याशी बोलणार नाही, असे सांगितले. याचा राग येऊन त्याने तरुणीचा तिचा हात पकडून तिची छेड काढली अन विनयभंग केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने आरडाओरडा केला, तेव्हा तिचे वडील आणि भाऊ मदतीला धावून आले. यावेळी चौघांनी त्या तरुणीला तसेच तिच्या कुटुंबाला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली. या गोंधळात एका महिलेने दगडफेक केली, ज्यातील एक दगड राहुल जाधव यालाच लागला यामध्ये तो जखमी झाला. या प्रकरणी त्या तरुणीने गुरुवारी ता. 18 रात्री सेनगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी राहुल जाधव, त्र्यंबक जाधव, आदित्य जाधव अन एका महिले विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, जमादार जिवन मस्के, सुभाष चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जमादार मस्के पुढील तपास करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर