ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

हातात बेड्या, तोंडावर काळं कापड अन् गळ्यात दोरखंड:गुंड बंडू आंदेकरचा निवडणूक अर्ज दाखल, भवानी पेठ कार्यालयात घोषणाबाजी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात आज उत्तर प्रदेश आणि बिहारमधील राजकारणाची आठवण करून देणारे धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. कुख्यात ‘आंदेकर टोळी’चा म्होरक्या आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गुंड बंडू आंदेकर याने आज पोलिसांच्या कडक बंदोबस्तात, हातात बेड्या आणि गळ्यात दोरखंड असलेल्या स्थितीत महापालिका निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष न्यायालयाने दिलेल्या सशर्त परवानगीनंतर आंदेकर कुटुंबातील तिघांनी तुरुंगातून बाहेर येत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या येरवडा कारागृहात असलेला बंडू आंदेकर आज दुपारी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात दाखल झाला. पोलिसांनी त्याला दोरखंडाने जखडलेले होते आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्याच्या चेहऱ्याला काळे कापड बांधले होते. मात्र, अर्ज भरण्यासाठी कार्यालयात जाताच आंदेकरने ‘व्हिक्ट्री साईन’ दाखवत घोषणाबाजी सुरू केली. “नेकी का काम, आंदेकर का नाम,” अशा घोषणा देत त्याने परिसर दणाणून सोडला. “बघा, मला लोकशाहीत कसं आणलंय. मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही. आंदेकरांना मत म्हणजे विकासाला मत,” असे ओरडून तो उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. आंदेकर कुटुंबातील तिघांनी भरला अर्ज केवळ बंडू आंदेकरच नव्हे, तर त्याच्या कुटुंबातील आणखी दोन महिलांनीही तुरुंगातूनच अर्ज भरले आहेत. सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर हेदेखील 5 कोटी 40 लाखांच्या खंडणी प्रकरणात जेलमध्ये आहेत. या दोघींनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. बंडू आंदेकर हा प्रभाग क्रमांक 24 मधून अपक्ष किंवा राष्ट्रवादीकडून लढण्याची शक्यता आहे. विशेष न्यायालयाने या तिघांनाही आगामी महापालिका निवडणुकीत उमदेवारी अर्ज भरण्यास परवानगी दिली. मात्र बंडू आंदेकरला उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, भाषण, घोषणाबाजी करायला कोर्टाने मनाई केली. असे असतानाही बंडू आंदेकरने केलेल्या घोषणाबाजीमुळे न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन झाले का? याची आता चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार गटाची ‘सावध’ साथ? दरम्यान, आंदेकर कुटुंबातील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांचा आयुष कोमकर हत्याकांडाशी थेट संबंध नसल्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी म्हटले. त्यामुळे या दोघींनाही राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. मात्र, आरोपी बंडू आंदेकरला ‘घड्याळ’ मिळणार की त्याला अपक्ष लढावे लागणार, यावर अद्याप सस्पेन्स कायम आहे. आंदेकर कुटुंब पुण्याच्या प्रभाग क्रमांक 22, 23 आणि 24 मधून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. पुणेकरांच्या काळजात धडधड एकेकाळी टोळीयुद्धामुळे हादरलेल्या पुण्यात आता थेट गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक तुरुंगातून निवडणूक लढवत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांच्या दोरखंडात जखडलेला उमेदवार जेव्हा विकासाच्या गप्पा मारतो, तेव्हा ती लोकशाहीची थट्टा आहे की मजबुरी? असा सवाल आता पुणेकर विचारत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर