ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

निवडणुकीआधी रावसाहेब दानवेंचा वादग्रस्त VIDEO व्हायरल:‘गोवंश बंदी मोडा’ म्हटल्याने खळबळ; भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये दानवे गोवंश बंदी कायद्याचे उल्लंघन करण्यास प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला जात आहे. मी आहे तोपर्यंत गोवंश बंदी लागू होऊ देणार नाही, असे वक्तव्य करताना ते दिसत असल्याने या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. निवडणुकांच्या तोंडावर आलेल्या या व्हायरल व्हिडिओमुळे भाजपची मोठी कोंडी झाल्याचे चित्र आहे. या व्हिडिओवर विरोधी पक्षांनी तात्काळ आक्षेप घेत भाजपवर जोरदार टीका सुरू केली आहे. विशेषतः गोवंश बंदी कायद्याबाबत भाजपची अधिकृत भूमिका लक्षात घेता, दानवेंचे हे वक्तव्य पक्षाच्या धोरणांशी विसंगत असल्याचा आरोप केला जात आहे. गोवंशाला ‘राज्यमाता’ घोषित करून मोठ्या प्रमाणात प्रचार करणाऱ्या पक्षातील वरिष्ठ नेत्याकडून अशा स्वरूपाचे विधान येणे हे धक्कादायक असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा वादग्रस्त व्हिडिओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत केलेल्या पोस्टमध्ये अंबादास दानवे यांनी भाजप आणि रावसाहेब दानवे यांच्यावर घणाघाती शब्दांत टीका केली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर व्हिडिओ अधिक वेगाने व्हायरल झाला असून, राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामुळे रावसाहेब दानवे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंबादास दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये भाजपच्या भूमिकेतील कथित दुटप्पीपणावर बोट ठेवले आहे. राज्यमाता म्हणायचं आणि खाटीकखाना उघडायचा? यालाच हिंदुत्वाचा ‘बळी’ म्हणतात,”अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली. गाईला राज्यमाता घोषित करणाऱ्या सरकारमधीलच माजी प्रदेशाध्यक्ष खुशाल गाई कापा, असे सांगत असल्याचा आरोप त्यांनी केला. हे वक्तव्य म्हणजे सत्तेसाठी गाईचा वापर करण्याचा प्रकार असल्याचे ते म्हणाले. मतांसाठी गोमातेचा वापर आणि प्रत्यक्षात मात्र कत्तलीला मोकळीक, असा आरोप करत अंबादास दानवे यांनी भाजपवर दुटप्पी राजकारणाचा ठपका ठेवला. मतांसाठी गोमाता आणि खासगीत कापाकापी, अशा शब्दांत त्यांनी या भूमिकेवर टीका केली. रावसाहेब दानवे हे अशा ‘बेगडी गॅंग’चे वरिष्ठ नेते असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपच्या हिंदुत्वाच्या दाव्यांची हीच खरी परीक्षा असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. व्हिडिओ नेमका कधीचा आहे, त्याची पार्श्वभूमी काय दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा झालेला नाही. मात्र, निवडणुकांच्या तोंडावर समोर आलेल्या या प्रकरणामुळे भाजपसमोर नवा राजकीय पेच निर्माण झाला आहे. विरोधकांकडून चौफेर टीका सुरू असताना भाजप या प्रकरणावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोवंश बंदी कायद्यावरून निर्माण झालेला हा वाद आगामी निवडणूक प्रचारात अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर