ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

पापरी जि. प. शाळेतील तब्बल 900 विद्यार्थ्यांवर 44 सीसीटीव्हीची नजर:आहारासाठी शाळेत कोल्हापूर पद्धतीची धूरमुक्त चूलही कार्यान्वित‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पापरी येथील जिल्हा परिषद शाळेतील ९०० विद्यार्थी आणि शिक्षकांवर ४४ सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असेल. चालू शैक्षणिक वर्षांपासून शाळेने पोषण आहारासाठी कोल्हापूर पद्धतीची धूरमुक्त चूलही कार्यान्वित केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही आणि धूरमुक्त चूल असणारी जिल्ह्यातील पापरी (ता. मोहोळ) येथील एकमेव पीएमश्री जिल्हा परिषद शाळा ठरली आहे. शाळेस पहिल्याच दिवशी ‘प्रवेश हाऊस फुल्ल’चा फलक लावावा लागला. प्रवेश फुल्ल होण्याचे हे दहावे वर्ष आहे. मोहोळ तालुक्यासह जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्तेसह, सामाजिक, पर्यावरणपूरक विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबवण्यात शाळा अग्रेस आहे. जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या पापरी येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २९ वर्गखोल्या असून शाळेत सर्व वर्ग क्रीडांगण परिसरासह लोकवर्गणी,लोक सहभाग तसेच शाळेला मिळालेल्या बक्षिसातून तब्बल ४४ सीसीटीव्ही कार्यरत केले असून इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कार्यरत असणारी एकमेव शाळा ठरली आहे. शाळेत दररोज ८५० हून अधिक विद्यार्थ्यांचा पोषण आहार बनवण्यासाठी शाळेने यावर्षी कोल्हापूर पद्धतीची धूरमुक्त चूल बसवली आहे. शाळेत पोषण आहार विद्यार्थ्यांना व्यवस्थित घेण्यासाठी उत्कृष्ट पद्धतीचे भव्य असे किचन शेडही नव्याने बांधण्यात आले असून, मुले, मुली स्वतंत्ररित्या पोषण आहार घेऊ शकतील, अशी व्यवस्था केली आहे, याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वतंत्र लक्ष दिले जाते. त्यामुळे गुणवत्ता वाढीसा‌ठी मदत होते, शाळेने विविध स्तरावरील पुरस्कारही मि‌ळविले आहेत. असे मुख्याध्यापक आबासाहेब टेकळे यांनी सांगितले. पापरी: शाळेत सीसीटीव्ही कन्ट्रोलरूमचे उद्घाटन करताना सीईओ कुशल जैन. सुविधा असलेली जिल्ह्यात एकच शाळा शाळेने ‘फेस रीडिंग’ उपक्रम ही सुरू केल्याने पालकांना विद्यार्थी शाळेत पोहचताच आणि शाळेतून निघताच मोबाइलवर संदेश प्राप्त होतो. फेस रीडिंग इतक्या मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही आणि धूरमुक्त चुलीची कामे शाळेने शासन निधी, बक्षीस मिळालेल्या पैशातून आणि लोकसहभागाच्या माध्यमातून केली आहे. या सर्वांसाठी तब्बल तीन लाख रुपये खर्च झाल्याचे पापरी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी यावे‌ळी बोलताना सांगितले. ^विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेने या अगोदर ‘फेस रीडिंग’ उपक्रम सुरू केला. आता नव्याने ४४ हून अधिक सीसीटीव्ही बसवत पूर्ण शाळाच कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आणली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही, पोषण आहारासाठी धूरमुक्त चूल व फेस रीडिंग सुविधा असलेली पापरीची जिल्हा परिषद शाळा सुविधा असलेली पापरीची ही जिल्ह्यात एकमेव शाळा आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच शिस्तीवरही अधिक भर दिला जात आहे. शाळेच्या सुरक्षिततेबाबत विश्वास निर्माण झाला आहे. -अविचल महाडिक, गटशिक्षणाधिकारी, मोहोळ पापरीची शाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षि ततेबाबत नेहमीच एक पाऊल पुढे असते. शाळेत शासनाच्या सूचना येण्या अगोदर १६ सीसीटीव्ही कार्यरत होते. आता नव्याने अजून २८ सीसीटीव्ही बसवण्यात आले असून, शाळेत २९ वर्ग खोल्या आहेत. प्रत्येक वर्गात आता सीसीटीव्ही बसवले असून, क्रीडांगण तसेच किचन ‘फेस रीडिंग’ उपक्रम ही शाळेने सुरू केल्याने पालकांना विद्यार्थी शाळेत पोहचताच तसेच निघताच मोबाइलवर ताबडतोब संदेश प्राप्त होतो. आवाजही स्पष्ट ऐकायला मिळणार

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर