ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

अजित पवार विमान अपघात प्रकरण:CBI चौकशीसाठी देवेंद्र फडणवीसांचे अमित शहांना पत्र, रोहित पवारांच्या मागणीची प्रतही जोडली

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरताना भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. या अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी संशय व्यक्त करत राज्य सरकारने सीबीआय चौकशीसाठी केंद्राला अद्याप पत्र दिले नसल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी लिहिलेले अधिकृत पत्र समोर आले असून, यामुळे या प्रकरणाला आणि राजकीय चर्चांना मोठी कलाटणी मिळाली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 मार्च रोजीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अधिकृत पत्र पाठवले असल्याचे समोर आले आहे. या पत्रात त्यांनी आमदार रोहित पवार यांच्या मागणीचा विशेष उल्लेख केला असून, त्यांच्या पत्राची प्रतही देवेंद्र फडणवीस यांनी सोबत जोडली आहे. रोहित पवारांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, फडणवीसांचे हे पत्र उघड झाल्यामुळे आता या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. दरम्यान, मंगळवारी आमदार रोहित पवार यांनी आपल्याकडे अपघात संदर्भात मोठी माहिती असल्याचे सांगितले होते. तसेच सरकारने काही पाऊल उचलले नाही तर माहिती समोर आणू, असा इशाराही त्यांनी दिला होता. रोहित पवार म्हणाले की, अपघात संदर्भातील मोठी माहिती माझ्याकडे आहे. अगदी काही माहिती आम्ही आत्ता समोर आणली आहे. सरकार काय पाऊल उचलते हे बघू नाहीतर ती मोठी माहिती समोर आणू, असा इशारा पवारांनी दिला. अजित पवार यांच्या सोबत सत्तेत असणारे किती स्मरण पत्र देणार, सत्तेत असून तुम्ही आपल्या माणसाला न्याय देऊ शकत नाही तुम्ही इतरांना काय न्याय देणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी हे सुद्धा अजित पवार यांच्या विमान अपघाता संदर्भात चर्चा व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. पण चर्चा होऊ द्यायची नाही असे दिसत आहे. VSR कंपनीला वाचवले जात आहे, याच्या मागे कोणीतरी मोठा माणूस असल्याची शंका पवारांनी व्यक्त केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर