ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

घाटनांद्र्याचा सुपुत्र भारतीय सैन्यात:नितीन कापसेचा जल्लोषात सत्कार

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | घाटनांद्रा गावचा सुपुत्र नितीन दगडूबा कापसे याची इंडियन आर्मीमध्ये क्लर्क या पदासाठी निवड झाली आहे. त्याच्या निवडिमुळे गावात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आह. त्याच्या या यशाबद्दल शुक्रवारी सायंकाळी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभागी होत नितीन कापसेचे जल्लोषात स्वागत केले. मिरवणुकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून झाली. नितीन कापसे, वडील दगडूबा कापसे, आई मीरा कापसे यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव मोरे, उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते नितीनचा शाल, श्रीफळ देऊन ढोल-ताशांचा गजरात सत्कार करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी झाली. “भारत माता की जय”, “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी गाव दुमदुमून निघाले. सजवलेल्या वाहनातून नितीनची गावातून मिरवणूक काढण्यात आली. गावातील अनेक महिलांनी नितिनचे ठिकठिकाणी औक्षण केले. मान्यवरांनी नितीनच्या जिद्द, मेहनत, चिकाटीचे कौतुक केले. तो गावातील युवकांसाठी प्रेरणा असल्याचे सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर