ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

ताडोबाच्या ‘झीनत’ वाघिणीने ओडिशात 4 बछड्यांना दिला जन्म:देशातील पहिला आंतरराज्यीय व्याघ्र स्थलांतर प्रयोग यशस्वी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून ओडिशातील सिमिलीपाल जंगलात स्थलांतरित केलेल्या ‘झीनत’ वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला आहे. या घटनेमुळे दोन राज्यांच्या वनविभागाद्वारे राबवलेली आंतरराज्यीय व्याघ्र स्थलांतर मोहीम यशस्वी ठरली आहे. सिमिलीपालमधील वाघांचा वंश सुरक्षित करण्याच्या प्रयत्नांना यामुळे मोठे यश मिळाले आहे. सिमिलीपाल अभयारण्यातील वाघांची संख्या वाढवण्यासाठी आणि त्यांच्यातील आनुवंशिक दोष टाळण्यासाठी ओडिशा सरकारने ताडोबातून वाघ आणण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर, ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 मध्ये ताडोबाच्या जंगलातून ‘जमुना’ आणि ‘झीनत’ या दोन वाघिणी ओडिशात पाठवण्यात आल्या होत्या. डिसेंबर 2024 मध्ये ‘झीनत’ने सिमिलीपालच्या सीमा ओलांडून झारखंड आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये सुमारे 250 किलोमीटर भटकंती केली. त्यानंतर बंगाल आणि ओडिशा वनविभागाने संयुक्त मोहीम राबवून तिला सुरक्षित पकडले. काही महिने विशेष देखरेखीखाली ठेवल्यानंतर, एप्रिल 2025 मध्ये तिला पुन्हा सिमिलीपालच्या मुख्य जंगलात सोडण्यात आले. तिथे तिचे स्थानिक नर वाघाशी मिलन झाले आणि आता तिने चार बछड्यांना जन्म दिला आहे. सध्या सॅटेलाईट कॉलरद्वारे या नव्या कुटुंबावर लक्ष ठेवले जात आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढत असल्याने, येथील वाघ इतर जंगलांमधील वाघांची संख्या वाढवण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. आंतरराज्यीय स्थलांतर प्रकल्पांतर्गत ताडोबातून ओडिशात ‘जमुना’ आणि ‘झीनत’ या दोन वाघिणींचे यशस्वी स्थलांतर करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, महाराष्ट्रांतर्गत वन्यजीव संतुलनासाठी ताडोबातून यापूर्वी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि नवेगाव-नागझिरा अभयारण्यातही वाघिणी पाठवण्यात आल्या आहेत. दुसऱ्या राज्यात जाऊन स्थानिक वाघाशी मिलन करून बछड्यांना जन्म देण्याचा ‘झीनत’चा हा पराक्रम भारतीय वन्यजीव इतिहासात महत्त्वाचा मानला जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर