ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मुंबईत मुसळधार पाऊस:महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज, सखल भागांतील पाण्याचा वेगाने निचरा

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांत ३०० मिलीमीटरहून अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असून ७ हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली असली तरी महानगरपालिकेने स्थापित केलेले उदंचन पंप, पर्जन्यजल उपसा केंद्रे तसेच पूरनियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्याचा वेगाने निचरा होत असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सखल भाग, रेल्वे स्थानके, महत्त्वाचे रस्ते, पूल तसेच किनारी भागांवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. संबंधित विभागांचे अभियंते, कर्मचारी आणि नियंत्रण कक्ष अहोरात्र २४ तास कार्यरत असून नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. नालेस्वच्छता, पर्जन्यजल वाहिन्या आणि जलनिचरा व्यवस्थेची नियमित पाहणी सुरू असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री घटनास्थळी पाठविण्यात येत आहे. तसेच झाडे पडणे, शॉर्टसर्किट, जलभराव किंवा इतर आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि इतर संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी केले आहे. दरम्यान, पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. महानगरपालिका नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवत असल्याचे महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी नमूद केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर