ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारचा मोठा निर्णय:तीन गुन्ह्यांच्या तपासासाठी एसआयटी स्थापन; तेजस्विनी सातपुते करणार तपास

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या कृष्णकृत्यांचा छडा लावण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. या प्रकरणाच्या निष्पक्ष आणि सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली असून, या पथकाच्या प्रमुखपदी तडफदार महिला आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता खरातच्या राजकीय आणि धार्मिक संबंधांसह शोषणाच्या रॅकेटचे धागेदोरे उघड होण्याची शक्यता आहे. राज्य गृह विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, अशोक खरात याच्याविरुद्ध नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर (शिर्डी) येथे नोंदवलेल्या तीन स्वतंत्र गुन्ह्यांचा तपास आता ‘SIT’मार्फत एकत्रितपणे केला जाईल. महाराष्ट्र पोलिस मुख्यालयाने या प्रकरणातील सर्व केस डायरी, पुरावे आणि जप्त केलेले साहित्य तातडीने या विशेष पथकाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. खरातवर तीन पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल अशोक खरात याच्यावर नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा आरोपाचा गुन्हा दाखल आहे. नाशिक ग्रामीणच्या वावी पोलिस ठाण्यात अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी पोलिस ठाण्यात पीडितेचे वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोपाचा गुन्हा दाखल आहे. ५८ व्हिडिओंचे रहस्य उलगडणार? अशोक खरातच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राइव्हमधील ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ हे या तपासातील सर्वात महत्त्वाचे दुवे मानले जात आहेत. तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील पथक आता या व्हिडिओंमधील महिलांची ओळख, यामागे असलेले मोठे रॅकेट, राजकीय-धार्मिक संबंध आणि खरातच्या मालकीच्या ‘श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट’मधील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करणार आहे. धार्मिक बुरख्याआड शोषणाचे साम्राज्य सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ट्रस्टचा अध्यक्ष असलेला खरात मर्चंट नेव्हीतून निवृत्त झालेला अधिकारी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्याने ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि ‘अंकशास्त्रज्ञ’ म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण केली होती. याच प्रतिमेचा वापर करून त्याने अनेक महिलांना जाळ्यात ओढल्याचा संशय आहे. सध्या अशोक खरात २४ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत असून, ‘SIT’च्या तपासात आता आणखी किती धक्कादायक खुलासे होतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा… 58 व्हिडिओ म्हणजे 58 महिलांवर अत्याचार का?:रूपाली पाटील ठोंबरे यांचे खळबळजनक आरोप, म्हणाल्या – चाकणकर पुरावे नष्ट करतील नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेल्या अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या अटकेने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. धार्मिक श्रद्धा आणि मंत्र-तंत्राच्या आडून महिलांचे शोषण करणाऱ्या खरातला बुधवारी पहाटे अटक करण्यात आली. या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. महिल्या आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या पुरावे नष्ट करतील, त्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ठोंबरे पाटील यांनी केली आहे. सविस्तर वाचा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर