ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

गावठी कट्ट्यासह सराईत आरोपी जेरबंद:15 लाख 42 हजारांचा ‎मुद्देमाल जप्त‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


श्रीरामपूर येथील हरेगाव रोडवरील एस कॉर्नर परिसरातून गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथकाने अटक केली. पोलिसांनी त्याचेकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, मोबाईल आणि स्कॉर्पिओ वाहनासह एकूण १४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक हरिष भोये, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे व त्यांच्या पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर या पथकास हरेगाव फाटा परिसरात काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून एक व्यक्ती गावठी कट्टा घेऊन फिरत असणाऱ्या पकडण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाजवळील एस कॉर्नर रोड परिसरात सापळा रचला. दरम्यान, हरेगावकडून श्रीरामपूरकडे येणारी विनानंबर स्कॉर्पिओ संशयास्पदरीत्या आढळून आली. पोलिसांनी वाहन अडवून चालकाला ताब्यात घेतले. त्याचे नाव अविनाश धनराज माकोने, (रा. निफाड, जि. नाशिक) असे आहे. तपासादरम्यान आरोपीविरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात विविध नऊ गुन्हे दाखल आहे. झडतीदरम्यान आरोपीच्या ताब्यातून ३० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल, २ हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे, १० हजार रुपयांचा मोबाईल आणि १५ लाख रुपयांची स्कॉर्पिओ असा एकूण १५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर