ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

सावरकर बदनामी प्रकरण:”त्या” बड्या सर्च इंजिन अन् नामांकित वृत्तपत्राविरोधात अटक वॉरंट काढा, सात्यकी सावरकरांचा कोर्टात अर्ज

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बदनामी प्रकरणात आवश्यक कागदपत्रे व माहिती सादर न केल्याने एका समाज माध्यम व सर्च इंजिन तसेच एका नामांकित वृत्तपत्राविरोधात अटक वॉरंट काढण्यात यावे, असा अर्ज सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मार्च 2023 मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक विधान केले होते. या विधानामुळे सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. पुणे येथील एमपीएमएलए विशेष न्यायालयात या दाव्याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरू असून, राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार हे सात्यकी सावरकर यांचा उलटतपास घेत आहेत. सावरकर यांच्यावतीने ॲड. संग्राम कोल्हाटकर बाजू मांडत आहेत. या खटल्यात न्यायालयाने यापूर्वी दंड प्रक्रिया संहिता कलम 91 अंतर्गत संबंधित समाज माध्यम, सर्च इंजिन आणि वृत्तपत्राला आवश्यक ती कागदपत्रे व माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यांचे वकील न्यायालयात हजर राहिले असले तरी, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आले नसल्याचे अर्जात म्हटले आहे. फिर्यादी पक्षाने यापूर्वीही संबंधितांविरोधात वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल केला होता, जो अद्याप प्रलंबित आहे. आता या संदर्भात नव्याने अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर 1 जून रोजी आदेश दिला जाईल, तसेच याच दिवशी बचाव पक्षाकडून पुढील उलटतपासणी केली जाईल.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर