ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

संगमनेरातील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे वनमंत्र्यांचे आदेश:बिबट्याच्या हल्ल्यात मृत सिद्धेश कडलग कुटुंबाला 10 लाखांची मदत‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


संगमनेर तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला मारण्याचे आदेश देण्यात आले. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात बाधित कुटुंबीयांना मदत व भविष्यातील हल्ले रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना दूरध्वनीवरुन दिले. संगमनेर तालुक्यात बिबट्यांचे हल्ले सातत्याने वाढत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी माजी मंत्री थोरात यांनी वनमंत्री नाईक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. दरम्यान, जवळे कडलग येथील बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या सिद्धेश सुरज कडलग यांच्या कुटुंबीयांना वन विभागामार्फत १० लाखांची मदत देण्यात आली. १३ डिसेंबर रोजी जवळेकडलग येथे सिद्धेश याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढत असून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे व डॉ. जयश्री थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. केवळ सहानुभूती न दाखवता कडलग कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार तांबे यांनी केली. त्यांनी वनमंत्री नाईक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत कुटुंबाला २५ लाखांची मदत मिळावी, अशी मागणी केली. यानुसार वनमंत्री नाईक यांनी १५ डिसेंबर २०२५ रोजीच्या पत्रानुसार उपवनसंरक्षक, अहिल्यानगर यांच्या कार्यालयामार्फत १० लाख रुपयांची मदत मंजूर करून वितरित केली. दरम्यान, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते उप वनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांचे प्राप्त झालेले २५ लाख रुपये मदतीचे पत्र सिद्धेशचे वडील सुरज कडलग यांना देण्यात आले. दहा लाख रुपये रक्कम पाच वर्षासाठी व उर्वरित पाच लाख रुपये रक्कम दहा वर्षा करिता कडलग यांच्या राष्ट्रीयकृत बँकखात्यावर फिक्स डिपॉझिट करण्यात येणार असल्याचे लेखीपत्र कडलग यांना सुपूर्द केले. यावेळी संगमनेर उपविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अमरजीत पवार, सागर केदार, संतोष कडलग, सुनील देशमुख, सचिन कडलग, अमोल देशमुख, किरण वामन उपस्थित होते. बिबट्यांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरूच ठेवा : आ. खताळ आमदार अमोल खताळ यांनी जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या सिद्धेश सुरज कडलग या सहा वर्षाच्या बालकाच्या घरी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. वनविभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या २५ लाख रुपये मदतीचे पत्र आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सिद्धेशचे वडील सुरज कडलग यांच्याकडे सुपूर्द केले. जवळे कडलग आणि परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश आ. खताळ यांनी वनविभाग अधिकाऱ्यांना दिले. या परिसरामध्ये जास्तीत जास्त पिंजरे लावावेत तसेच बिबट्यांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरूच ठेवावे, अशा सूचना आ. खताळ यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर