ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

दिव्य मराठी इम्पॅक्ट:अखेर पातोंडा गावातील शुद्ध पाणीपुरवठा झाला सुरळीत

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अकोट तालुक्यातील पातोंडा गावातील भीषण पाणीटंचाईचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ‘दैनिक दिव्य मराठी’च्या ग्राउंड रिपोर्टनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सलग ४० ते ४५ दिवस नळ कोरडे, दूषित पाणी, महिलांची फरपट आणि ग्रामस्थांचे हाल या गंभीर वास्तवावर प्रकाशित झालेल्या बातमीचा परिणाम दिसून आला आहे. अखेर गावात शुद्ध नळ पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला आहे. पातोंडा गावात सुमारे ६०० लोकवस्ती असून, गाव आधीपासूनच खारपान पट्ट्यात येत असल्याने क्षारयुक्त पाण्याचा गंभीर प्रश्न होता. मात्र, गत काही दिवसांत परिस्थिती आणखी बिकट झाली होती. गावातील नळ पूर्णपणे कोरडे पडले होते. प्रशासनाकडून पाठवण्यात आलेल्या टँकरमधील पाणीही दूषित व पिवळसर असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. अनेकांना शेवाळयुक्त विहिरीचे पाणी पिण्याची वेळ आली होती. महिलांना भर उन्हात किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत होते. काही नागरिक मजुरी सोडून पाण्यासाठी फिरत होते, तर दूषित पाण्यामुळे आजारांचा धोका वाढला होता. ‘मतदानाच्या वेळी गाव आठवते; पण संकटात कोणी फिरकत नाही,’ अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर ‘दैनिक दिव्य मराठी’ने गावात जाऊन परिस्थितीची पाहणी करत ग्राउंड रिपोर्ट केला होता. प्रशासनाचे दावे आणि प्रत्यक्ष परिस्थितीतील तफावत उघडकीस आणत गावातील महिलांची फरफट, दूषित पाणी आणि ग्रामस्थांचे हाल मांडले होते. अखेर पातोंडा गावात शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून ग्रामस्थांनी समाधान मानले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर