ब्रेकिंग न्यूज
Vishakha Raut यांचं नगरसेवक पद धोक्यात? | Thackeray Group News | News18 Marathi कुणालचा वडिलांसोबत वाद की दुसरंच कारण? खवड्या डोंगरावर नेमकं काय घडलं? संपूर्ण घटनाक्रम कापसावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव? असं करा रोगाच नियंत्रण, कृषी तज्ज्ञांनी दिला सल्ला, Video News 18 Marathi Headlines | 21 Aug | 9 AM | Kurla-Trombay Railway News | Auto Taxi Fare Price News सोशल मीडियावर फोटो पाहिला, गायिकेला फोन केला, जेवायला बोलावलं अन्…, कोल्हापूरच्या तरुणाचं भयंकर कांड Virender Sehwag Son : जसा बाप तसा बेटा! सेहवागच्या लेकाचा धमाका, सेम टू सेम कव्हर ड्राईव्ह; 157 च्या स्ट्रा… मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील गोसाई विठुजी कापसे यांचे निधन Jalgaon Crime News | नशिराबादमध्ये पोलिसाच्या घरात सशस्त्र दरोडा | Police Naik Ganesh Koli कमी खर्चात शेतीतून मिळेल भरघोस उत्पन्न, जमिनीच आरोग्य जपण्यासाठी 3 गोष्टी कराच, Video अवघ्या 5 वर्षांची चिमुकली, स्वातंत्र्यदिन कार्यक्रमावरून घरी आली, रिक्षावाल्यानं चॉकलेट दिलं अन्… भयंकर क…
SP News Maregaon

विधान परिषदेच्या 17 पैकी 14 ठिकाणी भाजपकडे स्पष्ट बहुमत:तरी शिवसेना-राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; युतीत जागावाटपावरून चुरस वाढली

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या आकडेवारीत भाजपचा मोठा दबदबा दिसून येत आहे. राज्यातील 17 पैकी 14 मतदारसंघांमध्ये भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याचे चित्र आहे. शिवसेनेकडे फक्त एका मतदारसंघात, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 2 मतदारसंघात मजबूत आकडेवारी असल्यामुळे महायुतीत जागावाटपावरून मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात शिवसेनेकडे बहुमताचा आकडा आहे. या ठिकाणी शिवसेनेकडे 275 मते असून भाजपकडे 241 आणि राष्ट्रवादीकडे 149 मते आहेत. मात्र, हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे यांच्यासाठी मागितला जात असल्याने तणाव निर्माण झाला आहे. दुसरीकडे पुणे आणि परभणी-हिंगोली या दोन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीकडे मजबूत स्थिती आहे. पुण्यात राष्ट्रवादीकडे 375 मते आहेत, तर भाजपकडे 335 आणि शिवसेनेकडे 82 मते आहेत. परभणी-हिंगोलीत राष्ट्रवादीकडे 123, भाजपकडे 111 आणि शिवसेनेकडे 74 मते आहेत. पुणे मतदारसंघामुळे महायुतीतील वाद आणखी तीव्र झाला आहे. राष्ट्रवादी स्वतंत्रपणे मजबूत दिसत असली, तरी भाजप आणि शिवसेनेची एकत्रित मतसंख्या राष्ट्रवादीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे भाजपने पुणे जागेवर दावा ठोकला आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या बदल्यात शिवसेनेकडून राष्ट्रवादीला परभणी-हिंगोली जागा देण्याची चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या सगळ्या घडामोडींमुळे महायुतीतील जागावाटपाचा पेच अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपच्या वाट्याला 15 जागा, शिवसेनेला 1 आणि राष्ट्रवादीला 1 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, महायुतीतील समतोल राखण्यासाठी भाजपकडून शिवसेनेला अधिक जागा देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेने 7 जागांची मागणी केली होती. त्यानंतर भाजपकडून 5 जागांची ऑफर देण्यात आली आणि पुढे हा आकडा 6 पर्यंत नेण्याबाबत चर्चा झाली. जळगाव, नाशिक आणि रायगड या जागांवरून सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. राज्यातील प्रमुख मतदारसंघातील आकडेवारी पाहिली तर ठाण्यात भाजपकडे 431, शिवसेनेकडे 309 आणि राष्ट्रवादीकडे 18 मते आहेत. नागपुरात भाजपची सर्वाधिक ताकद दिसून येत असून पक्षाकडे 501 मते आहेत. सोलापुरात भाजपकडे 304, सांगली-सातारात 371, धाराशिव-लातूर-बीडमध्ये 379, तर छत्रपती संभाजीनगर-जालन्यात 254 मते आहेत. नाशिकमध्ये भाजपकडे 186, शिवसेनेकडे 161 आणि राष्ट्रवादीकडे 107 मते आहेत. याशिवाय भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गोंदिया, अमरावती, यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्येही भाजपची मजबूत स्थिती दिसून येत आहे. तीनही पक्षांमध्ये अंतर्गत हालचाली वाढल्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील तीनही पक्षांमध्ये अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत. जागावाटप अंतिम करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू असून अनेक इच्छुक उमेदवारांकडून लॉबिंगही सुरू आहे. भाजपचा स्पष्ट वरचष्मा असला, तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आपल्या वाट्याच्या जागा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत महायुतीतील जागावाटपावर अंतिम निर्णय काय होतो आणि कोणत्या पक्षाच्या पदरात किती जागा पडतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर