ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

कठीण “कॅट’ परीक्षा क्रॅक करत स्नेहा लांडगे ‘आयआयएम रोहतक’मध्ये:५ नामांकित “आयआयएम’ कडून आले होते प्रवेशासाठी कॉल

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


रावसाहेब मरकड | शेवगाव येथील आबासाहेब काकडे संचलित काकडे विद्यालयाची माजी विद्यार्थिनी स्नेहा बाबासाहेब लांडगे हिने व्यवस्थापन (मॅनेजमेंट) क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश संपादन केले आहे. देशातील सर्वोच्च संस्थांपैकी एक असलेल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ (आयआयएम, रोहतक-हरियाणा) येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी स्नेहाची निवड झाली. देशातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ‘कॅट’ प्रवेश परीक्षेत स्नेहाने उत्तम गुण मिळवले. त्यानंतर झालेल्या आव्हानात्मक मुलाखतीत तिने आपल्या बुद्धिमत्तेची छाप पाडली. विशेष म्हणजे, तिला देशातील ५ वेगवेगळ्या प्रतिष्ठित ‘आयआयएम’ संस्थांकडून प्रवेशासाठी बोलावणे आले होते; मात्र तिने ‘आयआयएम रोहतक’ची निवड केली. स्नेहाचे इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण काकडे शैक्षणिक समूहात झाले, जिथे तिच्या यशाचा पाया रचला गेला. त्यानंतर तिने पुणे येथील नामांकित ‘डी. वाय. पाटील कॉलेज’मधून संगणकशास्त्र (कॉम्प्युटर सायन्स) विषयात पदवी पूर्ण केली. तिचे वडील काकडे शैक्षणिक समूहात कार्यालयीन अधीक्षक आहेत, तर आई माध्यमिक शिक्षिका आहे. घरातील या शैक्षणिक वातावरणामुळेच तिने हे यश खेचून आणले. स्नेहाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष शिवाजीराव काकडे व माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी तिचे विशेष कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ आणि दर्जेदार शिक्षण मिळाले, तर ते जागतिक पातळीवरही चमकू शकतात, हे स्नेहाने सिद्ध केले आहे. तिचे हे यश इतर हजारो विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा देणारे ठरेल, असा िवश्वास हर्षदा काकडे यांनी व्यक्त केला. स्नेहाने मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील मुलींच्या उच्च शिक्षणाच्या स्वप्नांना नवी भरारी देणारे ठरले आहे. तिच्या या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर