ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

काशी जगद्गुंरूच्या उपस्थितीमध्ये पंढरीत धर्मसभा, निघाली ग्रंथ दिंडी

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पंढरपूर ज्येष्ठ अधिक मासानिमित्त परमपूज्य श्रीमान काशी सिंहासन समाधीश्वर श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या धर्मसभा व ग्रंथ दिंडी सोहळ्याचे पंढरपूर येथील विराट मंगल कार्यालय, परतळे मठ, भक्ती मार्ग येथे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. वीरशैव लिंगायत समाज टाकळी रोड, पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने धर्मसभेचे आणि ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पंढरपूर शहर व ग्रामीण परिसरातील वीरशैव लिंगायत समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आद्य वीरशैव लिंगायत भजनी मंडळ यांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक काढण्यात आली. ग्रंथ दिंडीचे पूजन पंढरपूर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष युवराज डोंबे यांनी सहपत्नीक केले. ग्रंथ दिंडीनंतर श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी व गुरु सदाशिव शिवाचार्य वेळापूरकर महाराज यांचे कार्यक्रमस्थळी जयघोषात स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. शोभा कराळे यांनी केले, सिद्धेश्वर कोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर