ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन:इतिहास संशोधनातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपले

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवकालीन आणि मराठा इतिहासाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर फुफ्फुसाच्या संसर्गामुळे उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि मुली असा परिवार आहे. सांगली जिल्ह्यातील ‘तडसर’ हे डॉ. पवार यांचे मूळ गाव. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जयसिंगरावांच्या शिक्षणाची दिशा राजाराम कॉलेज, कोल्हापूर येथे बदलली. प्रारंभी अर्थशास्त्र विषयात रस नसतानाही त्यांनी नंतर इतिहासाची वाट धरली आणि शिवाजी विद्यापीठातून एम.ए. परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेल्या वसतिगृहांमुळेच आपण शिकू शकलो, ही कृतज्ञतेची भावना त्यांच्या मनात कायम होती. ‘पंचगंगा तिरी’ या त्यांच्या आत्मचरित्रातून त्यांचा हा जीवनप्रवास उलगडला आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई आणि महाराणी येसूबाई यांच्या जीवनावरील अनेक अज्ञात साधने त्यांनी प्रकाशात आणली. करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांचे चरित्र लेखून त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाची जगाला ओळख करून दिली. तसेच, दादोजी कोंडदेव यांच्या संदर्भातील त्यांची ऐतिहासिक मांडणी ही संशोधक म्हणून त्यांची विशेष ओळख ठरली.
पवारांना हे मिळाले पुरस्कार आयुष्यभर शाहू विचारांनी झपाटलेल्या डॉ. पवार यांना त्यांच्या कार्यासाठी 21 हून अधिक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्तेही त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर