ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

नाशिकच्या कश्यपी धरणामध्ये संगमनेर येथील दांपत्यासह 4 जणांचा बुडून मृत्यू:‘पप्पा-मम्मी’ म्हणत मुलगी पाण्याकडे बाेट दाखवत हाेती, तिला धावत जाऊन उचलले

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिक- हरसूल रस्त्यावरील कश्यपी धरणानजीक सुट्टीसाठी आलेले मखमलाबाद येथील सचिन कैलास ठोंबरे (३२), त्यांची गरोदर पत्नी रोहिणी ठोंबरे आणि त्यांच्यासोबत असलेली, शेजारी राहणारी दोन १६ व १४ वर्षीय मुले यांचा कश्यपी धरणात बुडून मृत्यू झाला. संगीता घाडगे या महिलेने पाण्याजवळ धावत जाऊन ठोंबरे यांच्या दोन वर्षाच्या मुलीला वाचवले. त्यानंतर या महिलेने आरडाओरड करून घटनेची माहिती धरणालगतच्या खाड्याची वाडी, धोंडेगाव येथील तरुणांना दिली. या घटनेत बुडालेली दोन मुले केतन अनिल पवार (१६) आणि कौशल्य अनिल पवार (१४) ही असून ती मानकर मळा येथे ठोंबरे कुटुंबियांच्या शेजारी राहात असल्याचे निष्पन्न होत असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे यांनी सांगितले. धरणालगतच्या गावात कुस्ती स्पर्धा सुरू होती. घटनेची माहिती मिळताच उपस्थित तरुणांनी थेट खोल पाण्यात उड्या घेऊन बुडणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला. तातडीने धाडसी पावले उचलल्याने ते सापडले, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. दोन वर्षांपासून नाशकात स्थायिक सचिन ठोंबरे हे सिव्हिल इंजिनिअर होते. ते संगमनेर तालुक्यातील ठोंबरे वस्ती, पिंपरणे येथील मूळचे रहिवासी होते. दोन वर्षांपूर्वी ते व्यवसायानिमित्त नाशिक येथील मखमलाबाद नाका परिसरात स्थायिक झाले होते. सुट्टीच्या दिवशी ते सहपरिवार कश्यपी धरणावर फिरण्यासाठी गेले. त्यावेळी ही दुर्घटना घडली. धाडसी महिलेमुळे ठोंबरेंची २ वर्षीय बालिका वाचली आम्ही धरणकाठावर उभे असताना लहान बाळ पाण्याकडे जाताना पाहिले. ही दोन वर्षांची लहान मुलगी रडत ‘मम्मी-पप्पां’कडे जाण्यासाठी पाण्याकडे बोट दाखवत असल्याचे लक्षात आले. मी पाण्याजवळ धावत जाऊन त्या लहान बाळाला उचलून घेतले. त्यानंतर शेजारील चपलांचे जोड पाहून एकाच कुटुंबातील व्यक्ती पाण्यात बुडाल्याचे लक्षात आले. लगेचच परिसरातील रहिवाशांना या घटनेची माहिती दिली. बुडालेल्यांचा शोध घेण्यासाठी तरुणांनी धरणात उड्या घेतल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर