ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

दहावी-बारावीच्या बाेर्ड परीक्षेच्या 10 ते 11 पानांच्या प्रश्नपत्रिका आता 4पानी:एसएससी, एचएससी बोर्ड पानांच्या सेटिंगमध्ये बदल करून फॉन्ट लहान करणार; परीक्षा शुल्कही घटणार

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बोर्डाच्या परीक्षांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत, १० ते ११ पानांच्या प्रश्नपत्रिका आता ४ पानांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या धोरणामुळे तसेच गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकत्र जोडल्याने मंडळाची दरवर्षी २८ कोटी रुपयांची बचत होणार आहे. विशेष म्हणजे, बचतीचा थेट फायदा विद्यार्थ्यांना मिळणार असून, आगामी काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात कपात करण्याचा सकारात्मक विचार बोर्डाकडून सुरू आहे. बोर्डाच्या प्रश्नपत्रिका १० ते ११ पानांच्या असल्याने विद्यार्थ्यांना ताण येत होता. त्यामुळे यंदापासून बोर्डाने प्रश्नपत्रिकांची पाने कमी करण्याचा निर्णय घेतला. यात प्रश्न रचनेत बदल नसून, पानांची सेटिंग बदल करून फॉन्ट लहान, मोठे करणार आहे. प्रश्नपत्रिका छपाईवर दरवर्षी ३० कोटी खर्च होतात. सध्या बाजारात रायटिंग व प्रिंटिंग पेपरचा भाव ७५,००० ते ८५,००० रुपये प्रति टन आहे. बदलामुळे २००० टन कागदाची बचत होऊन १५ ते १८ कोटी रुपये वाचणार आहेत. तर प्रिंटिंगसाठीच्या २ कोटी रुपयांचीही बचत होईल. दुसरीकडे, राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी म्हणाले की, पुढील शैक्षणिक वर्षापासून बदल, वेळेबाबत नियोजन सोपे जाईल. कठोर कायदा अन‌् पारदर्शकता बोर्डाने परीक्षा पद्धतीत सुधारणेसोबत गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र गैरप्रकार प्रतिबंधक कायदा १९८२ मध्ये दुरुस्ती केली जात आहे. आता उत्तरपत्रिकांशी छेडछाड किंवा पुनर्मूल्यांकनातील गैरप्रकार हे दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे ठरवले जातील असे देखील स्पष्ट केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर