ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

मोठी बातमी:शरद पवारांचा एक फोन अन् पुण्यात उमेदवारी फायनल; विधान परिषदेसाठी श्रीकांत पाटील मैदानात, पवारांचा मास्टरस्ट्रोक

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत महत्त्वाच्या राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने अखेर आपला उमेदवार निश्चित केला आहे. पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी स्वतः फोन करून श्रीकांत पाटील यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्याचं समजत आहे. त्यामुळे पुण्यातील विधान परिषद निवडणुकीत आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हं दिसत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत पाटील हे काही वेळातच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुणे विधान परिषद जागेसाठी अनेक नावांची चर्चा सुरू होती. मात्र अखेर शरद पवार यांनी थेट हस्तक्षेप करत श्रीकांत पाटील यांच्या नावाला अंतिम मान्यता दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पुण्यात संघटनात्मक ताकदीवर भर देत स्थानिक नेतृत्वाला संधी दिल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर विधान परिषद जागावाटपाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत 15 जागांवर उमेदवार निश्चित झाले आहेत. फक्त नाशिक आणि नांदेड या 2 जागांवर अजून चर्चा सुरू असून तिन्ही पक्षांनी दावा कायम ठेवला आहे. उर्वरित जागांवर मात्र एकमत झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस 8 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर ठाकरे गटाला रत्नागिरी, जळगाव, परभणी आणि हिंगोली या जागा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पुणे, ठाणे, सातारा आणि सांगली या जागांवर उमेदवार देणार आहे. त्यामुळे पुण्यातील लढत आता अधिक प्रतिष्ठेची मानली जात आहे. श्रीकांत पाटील यांच्या उमेदवारीमुळे पुण्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. आघाडी आणि महायुती यांच्यात राजकीय चुरस रंगणार दुसरीकडे महायुतीतही जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 17 पैकी 16 जागांवर महायुतीत जवळपास सहमती झाली असून त्यातील 10 जागा भाजप, 4 जागा शिवसेना आणि 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना या जागेबाबत अजून चर्चा सुरू असून त्यावर अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जोरदार राजकीय चुरस रंगणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर