ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

नागपुरात महिला केंद्रांमुळे वार्षिक ६९० टन कार्बन घट:कचरा व्यवस्थापन केंद्रांमुळे पर्यावरणाला मोठा फायदा, नवीन अहवालाचा निष्कर्ष

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नागपूर शहरात महिला बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या स्थानिक पातळीवरील कचरा व्यवस्थापन केंद्रांमुळे पर्यावरणाला मोठा दिलासा मिळत आहे. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि असर सोशल इम्पॅक्ट ॲडव्हायजर्स यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका नवीन अहवालानुसार, शहरातील केवळ चार सुका कचरा संकलन केंद्रांमुळे दरवर्षी कार्बनडायऑक्साइडच्या उत्सर्जनात तब्बल ६९० टनांची घट होत असल्याचे समोर आले आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील स्वयं सहाय्यता गटांकडून (बचत गट) चालविण्यात येत असलेल्या या केंद्रांच्या २०२५ मधील आकडेवारीचा अभ्यास या अहवालात करण्यात आला आहे. शहरातील सतरंजीपुरा झोन, मंगळवारी झोन, गांधीबाग झोन आणि हनुमान नगर झोनमधील चार सुका कचरा संकलन केंद्रांवरील कचऱ्याच्या माहितीच्या विश्लेषणातून हा महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आला आहे. या केंद्रांमुळे कचरा उघड्यावर जाळला न जाणे आणि त्यावर योग्य प्रक्रिया करून पुनर्वापर केला जाणे, यामुळे कार्बन उत्सर्जनात ही मोठी घट झाली आहे. नागपूर शहरामध्ये नोव्हेंबर २०२४ पासून सध्या १० सुका कचरा संकलन केंद्रे कार्यरत झाली असून, त्यापैकी सात केंद्रांचे कामकाज अत्यंत सुरळीत सुरू आहे. स्थानिक स्तरावर आणखी प्रभावी कचरा व्यवस्थापन करण्यासाठी शहराला सुमारे ४० केंद्रांची, म्हणजेच प्रत्येक प्रभागासाठी एका केंद्राची आवश्यकता असल्याचे या अहवालामध्ये प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे. ही केंद्रे भविष्यात सुरू झाल्यास शहरातील कचऱ्याची समस्या तर सुटेलच, पण त्यासोबतच स्थानिक महिलांसाठी २०० पेक्षा अधिक नवीन रोजगारसंधी निर्माण होऊ शकतात, असा विश्वासही अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर