ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

पोलिसांच्या 112 वर कॉल करत खोटी माहिती देणं पडले महागात:तरुणावर नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


डायल 112 या क्रमांकावर तब्बल सहा वेळा कॉल करून खोटी माहिती देणाऱ्या एका तरुणावर नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 26 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन समज दिली अन कुटुंबाच्या हवाली केले आहे. राज्यात पोलिस दलाच्या वतीने डायल 112 हा क्रमांक सुरु करण्यात आला असून अडचणीत सापडलेल्यांना नागरीकांना तातडीने पोलिस मदत मिळावी हा यामागचा उद्देश आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर नजीकच्या पोलिस ठाण्यास माहिती दिली जाते. त्यानंतर पोलिस ठाण्यात सुरु करण्यात आलेल्या डायल 112 कक्षातील कर्मचारी तातडीने घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरु करतात. दरम्यान, नर्सी नामदेव येथील वैजनाथ नागरे या तरुणाने डायल 112 या क्रमांकावर संपर्क साधून मला मारहाणी होत असून तातडीने मदत हवी आहे असे कळविले. त्यानंतर नर्सी पोलिस ठाण्याचे जमादार प्रभाकर माने यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी कोणीही नव्हते. त्यामुळे पथक पोलिस ठाण्यात परत आले. त्यानंतर काही वेळातच पुन्हा संपर्क साधून नर्सी येथे चोरी झाल्याची माहिती दिली. त्यावेळीही पोलिसांनी पाहणी केली तर कुठेही चोरी झाली नसल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी वैजनाथ याचा शोध घेऊन त्याला खोटी माहिती दिल्या प्रकरणी समज दिली अन त्याच्या कुटुंबियांच्या हवाली केले. मात्र त्यानंतरही त्याने तब्बल सहा वेळा संपर्क साधून खोटी माहिती दिली. या प्रकारानंतर जमादार प्रभाकर माने यांनी नर्सी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी वैजनाथ नागरे याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डी. के. दिघाडे पुढील तपास करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर