ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

दुचाकी चालवता येत नसल्याने मंगळसूत्र चोराने ‘60-40’ वाट्याने नेमला रायडर:संभाजीनगरात टोळी गजाआड; 10 तोळे सोने, 4 दुचाकी जप्त

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरात मॉर्निंग वॉक, रात्रीचा फेरफटका मारणाऱ्या किंवा मंदिरात जाणाऱ्या वृद्ध महिलांना हेरून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या कुख्यात अमोल गलाटे टोळीच्या गुन्हे शाखेने अखेर मुसक्या आवळल्या. या टोळीचा मुख्य सूत्रधार अमोल गलाटे याला दुचाकी चालवता येत नसल्याने त्याने चक्क ६०-४० टक्क्यांच्या वाटणीवर २ रायडर गुन्ह्यांसाठी सोबत ठेवले होते. चोरीच्या सवयीमुळे स्वतःच्या घरच्यांनीही घरातून हाकलून दिल्यानंतरही या टोळीने गुन्हेगारीचा मार्ग सोडला नाही. या टोळीकडून १० तोळे सोने आणि ४ दुचाकी असा तब्बल ९ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शहरातले ११ गुन्हे उघडकीस आल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली. अमोल वैजनाथ गलाटे (३३), मंगेश वाल्मीक शहाणे (२५), अल्ताफ मुबारक शेख (१९, सर्व रा. गारखेडा परिसर) आणि चोरीचे दागिने विकत घेणारा सराफा शेख सिराजुल हक शेख अन्वर अली (३६, रा. जवाहर कॉलनी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी अमोल गलाटेला दुचाकी चालवता येत नाही. त्यामुळे त्याने गुन्हे करण्यासाठी मंगेश शहाणे याला ‘रायडर’ म्हणून सोबत घेतले. चोरीतील मालापैकी ६० टक्के वाटा अमोलचा तर ४० टक्के वाटा रायडर मंगेशचा असे त्यांचे ठरले होते. विशेष म्हणजे आरोपी मंगेश हा स्वतः सराफा असल्याने त्याला दागिन्यांची अचूक पारख होती. खऱ्या व खोट्या दागिन्यांमधील फरक तो दुरूनच ओळखायचा. या दोघांनी मिळून ९ गुन्हे केले व नंतर जीवघेण्या हल्ल्यात फरार असलेल्या अल्ताफलाही सोबत घेतले. असे पूर्ण केले गुन्ह्यांचे ‘अर्धशतक’ अमोल गलाटे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीचे तब्बल ४५ गुन्हे दाखल आहेत. त्यात आता या ११ नव्या गुन्ह्यांची भर पडल्याने त्याने गुन्ह्यांचे ‘अर्धशतक’ (५६ गुन्हे) पूर्ण केले आहे. २०१५ ते २०२० या काळात त्याने अनेक घरफोड्या केल्या. २०२१ मध्ये त्याला एमपीडीएअंतर्गत कारागृहात डांबण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वीच तो आणि मंगेश शहाणे जेलमधून बाहेर आले आणि त्यांनी पुन्हा ‘६०-४०’च्या करारावर मंगळसूत्र चोरीचा सपाटा लावला. असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात २० मे रोजी पहाटे सहाच्या सुमारास पुंडलिकनगर भागातील कारगिल मैदानाजवळ मॉर्निंग वॉक करणाऱ्या सुलभा सोमवंशी (५८) यांना या टोळीने चाकूचा धाक दाखवून ३ तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा करत होती. तिसगाव ते मिटमिटा रोडवरील रेल्वे भुयारी मार्गाजवळ सापळा रचून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. मंगेशने चोरीचे सोने ओळखीचा सराफा सिराजुल याला विकल्याचे सांगितले. सिराजुल हा दागिने घडवणारा कारागीर आहे. पोलिसांनी त्यालाही बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळे पुंडलिकनगर (३), जवाहरनगर (४), चिकलठाणा, सिडको, एमआयडीसी वाळूज व सातारा प्रत्येकी १ असे एकूण ११ गुन्हे उघडकीस आले. सहायक आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अर्जुन कदम, अभिजित चिखलीकर, राजेंद्र साळुंके यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांवरच पाळत गुन्हे करण्यासाठी त्यांनी शहरातूनच दोन स्पोर्टस बाइक व एक दुचाकी चोरली. चोरी केल्यानंतर आरोपी मंगेश हा दुसऱ्या दिवशी आवर्जून वर्तमानपत्रातील बातम्या वाचायचा. ‘कोणते पोलिस अधिकारी आपल्या मागावर आहेत?’ हे पाहण्यासाठी तो सर्व पोलिसांना इन्स्टाग्राम व फेसबुकवर फॉलो करत होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर