ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

हिंगोलीत नोकरीचे आमिष दाखवून 6.21 लाखांची फसवणूक:नागपूरच्या दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली पंचायत समितीमध्ये आऊटसोर्सिंगमधून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 6.21 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या नागपूर येथील दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 26 रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील संगणक प्रशिक्षण केंद्र चालक शरद मोहारे यांची दोन वर्षापूर्वी नागपूर येथील ॲडराईट मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे विरेंद्र वाटकर व जगदिश राऊत यांच्याशी बसस्थानकावर भेट झाली होती. दोघांची चर्चा झाल्यानंतर त्यांनी मोहारे यांना आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून जागा निघालेल्या असून त्यासाठी कोणी ओखळीचे असेल तर सांगा लगेच रुजु होण्याचे आदेश देतो असे सांगितले. यावेळी मोहारे त्यांनी त्यांचा मुलगा व इतर दोघांसाठी विचारणा केली असता त्यांना हिंगोली पंचायत समितीमध्येच रोजगार हमी योजनेमध्ये टंकलेखक, पर्यवेक्षक व अन्य एक अशा तीन जागांवर नियुक्ती देण्याचे अमिष दाखविले. त्यासाठी पैसे लागतील असे सांगितले. त्यानंतर मोहारे यांनी ता. 31 मार्च 2024 ते ता. 20 ऑक्टोबर 2024 या कालावधीत ऑनलाईन पैसे देखील पाठविले. दरम्यान, पैसे देऊनही नियुक्तीचे आदेश मिळालेच नाही. त्यामुळे त्यांनी विरेंद्र व जगदिश याच्याशी संपर्क साधून आदेशाची मागणी केली. मात्र लवकरच आदेश मिळतील असे सांगत त्यांनी एक वर्षभर आदेशच दिले नाही. त्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोहारे यांनी पैशाची मागणी केली. तर त्यांनी पैसे देण्यासही टाळाटाळ चालवली होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मंगळवारी ता. 26 रात्री हिंगोली शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी विरेंद्र वाटकर, जगदिश राऊत यांच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संदीप मोदे,सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे पुढील तपास करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर