ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

भाजपने विधान परिषदेसाठी खेळले ओबीसी कार्ड; सिरसाठांना मिळाली संधी:विधानसभेत आई-वडील पराभूत, सरपंच ते न.प.अध्यक्ष पदाने घडवली कारकीर्द

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


फुलंब्रीचे माजी नगरपंचायत अध्यक्ष सुहास सिरसाठ यांच्या रूपाने भाजपचा छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य विधान परिषद मतदारसंघातील पहिला आमदार होणार आहे. मागील ३६ वर्षांपासून सिरसाठ कुटुंबाला आमदारकी हुलकावणी देत राहिली. वडील अॅड. त्र्यंबकराव सिरसाठ व आई पार्वताबाई सिरसाठ यांना विधानसभा निवडणुकीत फुलंब्री मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. मुलाने आपले कर्तृत्व सिद्ध करताना दोन वेळेस फुलंब्रीचे सरपंचपद आणि पाच वर्षें नवीन नगरपंचायत अध्यक्षपद भूषविले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्षपद सांभाळताना न.प. निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. सिरसाठ संपले म्हणून विरोधकांसह पक्षातील हितचिंतक कंडी पिकवत असताना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी देत सर्वांना धक्काच दिला. भाजपने पुन्हा एकदा ओबीसी कार्ड खेळत राज्यातील मोठ्या समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुहास सिरसाठ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. फुलंब्री शहरावर पकड असलेले सुहास सिरसाठ भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत. न.प. निवडणुकीत झालेल्या पराभवाने खचून न जाता त्यांनी संघटन कामात सक्रियता दाखविली. उमेदवारीने भाजपमधील प्रस्थापितांना मिळाला इशारा भाजपने सिरसाठ यांना उमेदवारी देत भाजपमधील प्रस्थापितांना इशारा दिला. न.प.मध्ये पराभूत झाल्याने आमदारकी मिळणार नाही हे मिथ्थक यातून भाजपने तोडले. इतर मागास समाजातील माळी समाजाला प्रतिनिधित्व देत भाजपने आपला जनाधार मजबूत करण्यावर भर दिला. मंत्री अतुल सावे यांची भूमिका न. प., मनपा व जिल्हा परिषद निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीतही महत्त्वपूर्ण ठरल्याचे स्पष्ट झाले. सावे ज्यांच्या पारड्यात वजन टाकतात त्याची सरशी होते, अशी चर्चा रंगली आहे.

इनसाइड स्टोरी – ३६ वर्षांची प्रतीक्षा संपली, सिरसाठ कुटूंबाला दिलासा सिरसाठ कुटुंब प्रारंभापासून काँग्रेसमध्ये होते. वडील ॲड. त्र्यंबकराव सिरसाठ यांना १९९० मध्ये विधानसभेची उमेदवारी मिळाली होती. भाजपचे हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा पराभव केला. आई पार्वताबाई सिरसाठ १९९२ ते १९९४ मध्ये छत्रपती संभाजीनगर पं.स.च्या सभापती होत्या. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले. त्यांना राज्यपाल हरिभाऊ बागडेंनी पराभूत केले. त्यानंतर सुहास सिरसाठ राजकारणात आले. दोनवेळ फुलंब्रीचे सरपंच व एकवेळ न.प.चे अध्यक्ष राहिले. फुलंब्रीवर मजबूत पकड असलेल्या सुहास यांचा नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पराभव झाला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर