ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

काँग्रेसच्या ट्रॅक्टर-डबकी मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले:कृत्रिम खत टंचाई, बोगस बियाणे, पीक विम्याचा मुद्दा गाजला‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शेतकऱ्यांची लूट थांबवा…, बोगस बियाणे विकणाऱ्यांना जेलमध्ये टाका…, रात्रीची वीज बंद करा, दिवसा वीज द्या… अशा गगनभेदी घोषणा, ट्रॅक्टर्सचा धडधडाट आणि डबक्यांचा (ढोल) कडकडाट करत मंगळवारी यवतमाळ शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने ऐतिहासिक आणि आक्रमक ‘ट्रॅक्टर-डबकी मोर्चा’ काढण्यात आला. खरीप हंगाम तोंडावर असतानाही शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांकडे डोळेझाक करणाऱ्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी यवतमाळ विधानसभेचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वात हा भव्य मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या आंदोलनाने संपूर्ण यवतमाळ शहराचे लक्ष वेधून घेतले असून, शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीमुळे प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, जिल्हा युवक काँग्रेस आणि सर्व आघाड्यांच्या वतीने आयोजित या मोर्चाची सुरुवात शहरातील मेडिकल चौक (दोन पंजा) येथून झाली. ट्रॅक्टर्ससह आंदोलक रस्त्यावर उतरल्याने लाठीवाला पेट्रोल पंप, संविधान चौक, दत्त चौक ते महात्मा ज्योतिबा फुले स्मारक हा संपूर्ण परिसर काँग्रेसमय झाला होता. हातात पक्षाचे झेंडे आणि सरकारच्या धोरणांचा निषेध करणारे फलक घेऊन हजारो शेतकरी आणि तरुण या मोर्चात ताकदीने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना मागण्यांचे उर्वरित. पान ४ शेतकऱ्यांच्या समस्या प्रलंबित डीएपी, युरियाची टंचाई दूर करून पुरवठा सुरळीत करा, बोगस खते, बियाणे,कीटकनाशक कंपन्या, विक्रेत्यांवर कारवाई करा, सोयाबीन, कापूस, तुरीचा पीक विमा मंजूर करा कॅनमध्ये डिझेल देण्यावरील अटी रद्द करा रात्रीची वीज बंद करून दिवसा सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करा. शेतकऱ्यांच्या अश्रूंची किंमत सरकारला मोजावी लागेल ^राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. खरीप हंगाम सुरू होत आहे, पण शेतकरी अजूनही बियाणे आणि खतांसाठी वणवण भटकत आहे. सरकारने ही सुस्तपणाची भूमिका न सोडल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. – शिवाजीराव मोघे, माजी मंत्री.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर