ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

मुंढवा जमीन घोटाळा:पार्थ पवारांना क्लीन चिट नाही, दोन अधिकाऱ्यांच्या बडतर्फीची शिफारस; खारगे समितीचा अहवाल सादर

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन खरेदी प्रकरणाचा तपास करणाऱ्या विकास खारगे समितीचा तब्बल ४ हजार ३९२ पानांचा सविस्तर अहवाल अखेर विधिमंडळात सादर करण्यात आला आहे. या अहवालाने महसूल आणि नोंदणी विभागात मोठी खळबळ उडवून दिली असून, अनेक बड्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या अहवालात कोणालाही स्पष्टपणे ‘क्लीन चिट’ देण्यात आलेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या नावाचा थेट उल्लेख नसला, तरी भविष्यातील पोलीस तपासात त्यांच्यावरील कारवाईची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यांच्यावर ‘टांगती तलवार’ कायम असल्याचे मानले जात आहे. खारगे समितीने या घोटाळ्याचा सखोल अभ्यास करून जबाबदार अधिकाऱ्यांच्या बडतर्फीची शिफारस केली आहे. यामध्ये रवींद्र तारु (सहायक दुय्यम निबंधक) आणि सूर्यकांत येवले (तहसीलदार) यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. शीतल तेजवानी आणि अशोक गायकवाड यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पार्थ पवार यांचे मावस भाऊ दिग्विजय पाटील यांना ‘अमेडिया कंपनी’ प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. अहवालातील निष्कर्ष काय? खारगे समितीने एकूण ७ बैठका घेऊन आणि तीन वेळा मुदतवाढ घेऊन हा सविस्तर अहवाल तयार केला आहे. अहवालातील काही धक्कादायक निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत. पार्थ पवारांबाबत सस्पेन्स कायम राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या पार्थ पवार यांच्या भूमिकेबाबत समितीने सावध पवित्रा घेतला आहे. अहवालात त्यांच्या नावाचा थेट कारवाईसाठी उल्लेख नाही. मात्र, “भविष्यातील फौजदारी तपासात जर अधिक लोकांचा सहभाग किंवा पुरावे आढळले, तर त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते,” असे समितीने नमूद केल्याने हा विषय अद्याप संपलेला नाही, हे स्पष्ट होते. फौजदारी चौकशीतून नवे खुलासे होणार? समितीचे कार्यक्षेत्र केवळ प्रशासकीय अनियमिततेपुरते मर्यादित होते, त्यामुळे त्यांनी फौजदारी स्वरूपाचा सखोल तपास केलेला नाही. मात्र, आता हा अहवाल पटलावर आल्यानंतर पोलीस तपासाला गती मिळणार असून, येत्या काळात महसूल विभागातील आणखी काही ‘बड्या माशांचे’ नाव या घोटाळ्यात समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर