ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

तुमच्या मुलीसोबत लग्न लाऊन द्या, अन्यथा वडिलांना जीवे मारेन:तरुणाने घरात घुसून दिली धमकी; बीडमधील खळबळजनक प्रकार

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून गुन्हेगारीचे सत्र सुरूच असून, केज आणि अंबाजोगाई येथे दोन खळबळजनक घटना समोर आल्या आहेत. केजमध्ये एका तरुणाने एका घरात बेकायदेशीर प्रवेश करून, मुलीचे लग्न लावून न दिल्यास तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. तर दुसऱ्या घटनेत अंबाजोगाई येथे एका 28 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या दोन्ही गंभीर प्रकरणांची दखल घेत पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका खेडेगावात एका तरुणाने सायंकाळच्या सुमारास घराच्या छतावरून उडी मारून बेकायदेशीरपणे प्रवेश केला आणि “तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशी लावून द्या, अन्यथा तिच्या वडिलांना जीवे मारीन” अशी धमकी देत मायलेकींना धमकवले. या खळबळजनक प्रकाराबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून केज पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. अंबाजोगाईत लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार अंबाजोगाई शहरात लग्नाचे आमिष दाखवून एका 28 वर्षीय महिलेवर गेल्या दोन वर्षांपासून अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सलमान अजीज पठाण या संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याने विवाहासाठी महिलेवर धर्मांतराची सक्ती केल्याचा आणि तिला धमकावल्याचा गंभीर आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असून अंबाजोगाई शहर पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेबाबत अधिक माहिती देताना अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद जोगदंड यांनी सांगितले की, पीडित महिला आणि आरोपी गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. फिर्यादी महिला विवाहित असून तिला चार अपत्ये आहेत. लग्नाचे आमिष देऊन विश्वासघात, अत्याचार आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर