ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

बारामतीत मोठा ट्विस्ट:काँग्रेस माघारीच्या तयारीत; बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा? विजय वडेट्टीवार यांची माहिती

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर मोठी घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असताना काँग्रेस पक्ष माघार घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बारामतीतील निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग जवळपास मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार आज दुपारपर्यंत आपला अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. काल प्रदेशाध्यक्षांसोबत पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत अनेक नेत्यांनी माघार घेण्याच्या बाजूने भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या आहेत. सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी मागील काही दिवसांत विविध स्तरांवर चर्चा, बैठका आणि संपर्क सुरू होता. अखेर या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्षांकडून पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दुपारपर्यंत केंद्रीय नेतृत्वाची परवानगी मिळाल्यास काँग्रेस अधिकृतपणे उमेदवारी मागे घेईल, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे बारामतीतील राजकीय चित्रात मोठा बदल होण्याची शक्यता असून, आता अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भातील खालील बातम्या देखील वाचा…. शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला:बारामतीची जागा अपघाताने रिक्त झाली, निवडणूक बिनविरोध व्हावी; शेवटच्या दिवशी निर्णायक क्षण बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक सध्या राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही काँग्रेसला निवडणूक बिनविरोध करण्याचा सल्ला देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ राजकीय नव्हे, तर भावनिक दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. पूर्ण बातमी वाचा…. रोहित पवारांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांशी बंद दाराआड चर्चा:बारामतीत काँग्रेस ठाम, शेवटच्या दिवसाकडे सर्वांचे लक्ष बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. या भेटीत काँग्रेसने बारामतीतून उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी संवाद झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करून निवडणूक लढवण्याचा निर्धार आधीच स्पष्ट केला आहे. पूर्ण बातमी वाचा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर