ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

मी कोणताही चुकीचा शब्द वापरला नाही:हर्षवर्धन सपकाळांचे स्पष्टीकरण; PM नरेंद्र मोदींविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशातील आणि राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यास सुरू केले आहे. महाविकास आघाडीकडून काल (दि. 26 मे) कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने 3 तास रस्ता जाम आंदोलन केले होते. या आंदोलनात बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आज पुन्हा पत्रकार परिषद घेत हर्षवर्धन सपकाळ यांनी मी कोणताही चुकीचा शब्द वापरला नसल्याचे म्हणत स्पष्टीकरण दिले आहे. पत्रकार परिषदे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, काल कांदा प्रश्नी तीन तास रस्ता जाम आंदोलन केले. त्यात रोहित दादा होते, शशिकांत शिंदे होते, अंबादास दानवे होते तसेच इतर मित्र पक्ष होते. रस्ता जाम आंदोलनात लोक रस्त्यावर उतरले होते. याचा परिणाम म्हणजे आज सरकारचे मंत्रिमंडळाला दिल्लीला जावे लागले. हे मंत्रिमंडळ दिल्लीला गेले असले तरी हात हलवत परत येऊ नका हा आमचा त्यांना सज्जड दम आहे, असे सपकाळ यांनी म्हटले. मी कोणताही चुकीचा शब्द वापरलेला नाही पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका करताना म्हटले की, हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे. त्यांच्यामध्ये टोळी युद्ध सुरू झाले आहे. सत्तापिपासू लोक आहेत, त्यांचा हा फक्त सत्ता मिळवण्यासाठी खेळ सुरू आहे. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी काल भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना अपशब्दांचा वापर केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, मी कोणताही चुकीचा शब्द वापरलेला नाही. ‘दलिंदर’ हा जो शब्द आहे हा कॅरक्टर दाखवणारा, लक्षण दाखवणारा शब्द आहे. दरिद्री या संस्कृत शब्दातून तो शब्द आलेला आहे. मोदी आल्यापासून देशात गरीबी वाढली हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले, मोदी आल्यापासून देशात गरीबी वाढलेली आहे, शेतकऱ्यांचे भाव पडलेले आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे, महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, भ्रष्टाचार बोकाळला आहे आणि अशा परिस्थितीच्या संदर्भात काल मी त्यांचा तो उल्लेख केला. पण हा शब्द त्यांना खटकला असेल तर नरेंद्र मोदी हे ‘पनवती’ आहेत, हा समजेल असा शब्दप्रयोग मी पुन्हा एकदा करतो. प्राजक्त तनपुरेंविषयी काय म्हणाले शशिकांत शिंदे? तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटातील प्राजक्त तनपुरे हे भाजपच्या वाटेवर असल्याचे दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे म्हणाले, निवडणुकीच्या माध्यमातून काही लोक तिकडे जात आहेत, ही बातमी मी सुद्धा ऐकली आहे. मात्र, अजून तरी त्यांच्याकडून पक्षाकडे राजीनामा किंवा त्यांचे मत व्यक्त केलेले नाही. परंतु, मला असे वाटते की मागच्या निवडणुकीच्या वेळी काही चौकश्या त्यांच्या मागे लावलेल्या होत्या. त्याच्या संदर्भात भाजपने दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न केला आहे. किंवा त्यांना काही आश्वासन दिले असतील तर मला असे वाटते की त्यांनी निर्णय घेतला असेल.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर