ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

गहाळ झालेले 10 लाख रुपयांचे 60 मोबाईल मुळ मालकांना परत:हिंगोली जिल्ह्यातील पोलिस दलाची कामगिरी; शोध मोहिम यशस्वी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली जिल्हयात गहाळ झालेल्या मोबाईलची शोध मोहिम हाती घेऊन जिल्हा पोलिसांनी तब्बल १० लाख रुपये किंमतीचे ६० मोबाईल शोधून मुळ मालकांना परत केले आहे. शनिवारी ता. ३० एका विशेष कार्यक्रमात पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांच्या हस्ते मोबाईल देण्यात आले आहेत. हिंगोली जिल्हयात मागील काही दिवसांत मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहेत. विशेषतः आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरीकांचे मोबाईल चोरट्यांनी हातोहात लांबविले. या शिवाय बसस्थानक, रेल्वेस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन देखील चोरट्यांनी मोबाईलवर हातसाफ केले आहेत. जिल्हयात मोबाईल चोरीच्या घटना उघडकीस आणून मोबाईल जप्तीसाठी पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, उपाधिक्षक मयुर रसाळ, गुन्हे शाखेेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन केले होते. यामध्ये जिल्हयातील १३ ठाणेदारांसह गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार दत्ता नागरे, इरफान पठाण, मारोती काकडे, गणेश लेकुळे, प्रदीप झुंगरे, प्रणिता मोरे यांच्या पथकाने मागील एक महिन्यात ६० चोरीला गेलेले ६० मोबाईल जप्त केले आहेत. दरम्यान, आज विशेष कार्यक्रमात १० लाख रुपये किंमतीचे मोबाईल मुळ मालकांना परत करण्यात आले आहे. पोलिस दलाच्या कामगिरी बद्दल नागरीकांनी कौतूक केले. पावती विना मोबाईल खरेदी करू नका जिल्हयात नागरीकांनी पावती विना मोबाईल खरेदी करू नये. तसेच जूना मोबाईल खरेदी करतांनाही ज्यांच्याकडून खरेदी करीत आहोत त्याच्याकडे पावतीची मागणी करावी. तसेच मोबईल हरविल्यानंतर तातडीने जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर