ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

अपना सपना मनी मनी…:महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा ॲडव्हान्स, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मध्यरात्री एक अत्यंत खळबळजनक ट्विट करत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला आहे. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी रात्रीत कोट्यवधी रुपयांचा ॲडव्हान्स वाटण्यात आल्याचा धक्कादायक दावा संजय राऊत यांनी केला आहे. अपना सपना मनी… मनी! – राऊतांचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत सरकारवर निशाणा साधला. राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “अपना सपना मनी… मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी… रात्री प्रत्येकी 15 कोटींचा ॲडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे!” देवेंद्र फडणवीसांना केले टॅग संजय राऊत यांनी आपल्या या गंभीर आरोपाच्या ट्विटमध्ये थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. एका बाजूला ठाकरे गटाचे 6 खासदार दिल्लीत तळ ठोकून असल्याच्या आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. राऊत यांनी थेट 15 कोटींच्या ॲडव्हान्स’चा आकडा जाहीर केल्याने पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 19 जून रोजी घातल्या जाणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच ठाकरे गटात मोठी पडझड घडवून आणण्यासाठी हे ‘ऑपरेशन मनी’ सुरू असल्याचा थेट रोख संजय राऊत यांच्या दाव्यावरून दिसून येत आहे. आता राऊत यांच्या या आरोपावर सत्ताधाऱ्यांकडून काय प्रत्युत्तर येते, याकडे संपूर्ण लक्ष लागले आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान: 31 उमेदवार, 7043 मतदार, ईव्हीएम नव्हे, मतपत्रिकेचा वापर, संभाजीनगरात तिरंगी लढत स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधान परिषदेवर निवडल्या जाणाऱ्या आमदारांसाठी गुरुवार, १८ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत मतदान होत आहे. २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक होणार होती. मात्र, त्यातील अहिल्यानगर, ठाणे, यवतमाळ, पुणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या ६ जागा बिनविरोध झाल्या. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर