ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

यमाई तलाव ट्रॅकची दुरवस्था, पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात:पंढरपूर पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे कचऱ्याचे साम्राज्य आणि दुर्गंधी‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पंढरपूर शहरातील नागरिकांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे फिरण्याचे मुख्य केंद्र असलेल्या यमाई तलाव ट्रॅक (उद्यान) परिसराला सध्या प्रशासकीय अनास्थेचे ग्रहण लागले आहे. एकेकाळी सुंदर आणि शांत असलेल्या या परिसरात आता समस्यांचे साम्राज्य निर्माण असून, पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यमाई तलावाच्या भराव्यावर चालण्यासाठी ट्रॅक बनवण्यात आलेला आहे. या ठिकाणी सुशोभिकरणही करण्यात आल्याने शहरातील नागरिकांचे हे विरंगुळ्याचे ठिकाण बनलेले होते. मात्र सध्या या ट्रॅकवर कचऱ्याचे साम्राज्य आणि दुर्गंधी, ट्रॅकच्या परिसरात जागोजागी कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या आणि जनावरांची विष्ठा पडलेली दिसत आहे. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, सकाळी आणि संध्याकाळी शुद्ध हवेसाठी फिरायला येणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरून चालावे लागत आहे. स्वच्छतेअभावी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या उद्यानाला कोणत्याही प्रकारचे मजबूत संरक्षक कंपाऊंड (भिंत) नाही. परिणामी, परिसरात मोकाट जनावरे सहजपणे घुसतात. फिरायला येणाऱ्या लहान मुलांच्या आणि वयस्कर नागरिकांच्या अंगावर ही जनावरे धावून जाण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच येथील बसण्यासाठी बनवलेले बाकडे पूर्णपणे तुटलेले असून पादचाऱ्यांसाठीचे पेव्हर ब्लॉकही फुटले आहेत, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना चालताना अडखळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. पंढरपूर नगरपालिकेने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन उद्यानाची दुरुस्ती करावी, कचरा साफ सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या ट्रॅक परिसरातील वीज यंत्रणेची मुख्य डीपी पेटी उघड्या अवस्थेत पडलेली आहे. या भागात लहान मुले मोठ्या संख्येने खेळायला आणि फिरायला येतात. खेळता खेळता मुलांचा हात या उघड्या डीपीला लागल्यास मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. महावितरण आणि नगरपालिका प्रशासनाला एखाद्या मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. ^आम्ही रोज या ठिकाणी आरोग्यासाठी फिरायला येतो, पण येथील दुरवस्था पाहून मनस्ताप होतो. उघडी डीपी आणि मोकाट जनावरे यामुळे जीवाला धोका निर्माण झाला . – महेश माने, नागरिक लवकरच गैरसोयी दूर करणार ^यमाई तलाव सुशोभीकरणाचे काम सुरू होत आहे, निविदा प्रक्रिया सुरू आहे. विधानपरिषद आचार संहिता झाली की प्रक्रिया पूर्ण होईल. तरीही तातडीचे उपाय म्हणून मुख्याधिकारी यांच्यासह ट्रॅकची पाहणी करून गैरसोयी दूर करू. प्रणिता भालके, नगराध्यक्ष करावा, डीपी पेटी बंद करावी आणि झाडांना पाण्याची व्यवस्था करावी, ज्येष्ठ नागरिकांना चालताना अडखळून पडण्याची भीती निर्माण झाली, अशी जोरदार मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे. अन्यथा पालिका प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. उघडी डीपी पेटी: नागरिकांना देते मृत्यूला आमंत्रण जीवाला धोका निर्माण

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर