ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया:म्हणाले- मी पुण्यातच, दिल्लीला गेलो नाही; पक्षाकडून व्हीप जारी

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना ठाकरे गटातील ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा आता दिल्लीपर्यंत पोहोचली असून, यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणुकीच्या काळात कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंसोबत शेवटपर्यंत राहण्याच्या आणाभाका घेणाऱ्या ओमराजेंचे नाव या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेत आल्यामुळे, त्यांचे जुने व्हिडीओ व्हायरल करत त्यांना राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. दरम्यान, या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांनी ‘ऑपरेशन टायगर’वर आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, ‘मी सध्या पुण्यातच आहे,’ असे स्पष्ट करत या चर्चांना बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. ओमराजे निंबाळकर म्हणाले, मी दिल्लीला गेलो नाही. मी पुण्यातच आहे. 20 तारखेनंतर मी मीडियाला माझी भूमिका सांगणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे निंबाळकरांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चेला तूर्तास अल्पविराम मिळाले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून व्हीप जारी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने अधिकृत व्हीप जारी केला असून, त्यानुसार उद्या, 18 जून रोजी संसदीय पक्षाची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला सर्व खासदारांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली असून, बैठकीला किती खासदार हजर राहतात आणि किती गैरहजर राहतात, यावरून पक्षातील बंडखोर खासदारांचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, ठाकरे गटासाठी एक दिलासादायक बाब समोर येत असून, बंडाच्या चर्चेत असलेल्या सहापैकी दोन खासदार पुन्हा स्वगृही परतण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एका खासदाराशी संपर्क झाला, सुषमा अंधारेंचा दावा दरम्यान, या घडामोडी सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका खासदाराशी संपर्क झाल्याचा दावा केला आहे. फुटीर खासदारांच्या यादीत असलेल्या संजय दिना पाटील यांच्याशी संपर्क झाल्याची माहिती अंधारे यांनी दिली आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी खासदार अरविंद सावंत यांना संपर्क केला होता. मी कुठेही जात नाही असे त्यांनी सांगितले. ते तिकडे जात नाहीत. मग कोण जात आहे? असा सवाल अंधारे यांनी केला आहे. उद्याच्या बैठकीला सगळे खासदार आले तर मी जाहीर माफी मागेल- अंधारे सुधमा अंधारे म्हणाल्या, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना फोन लागले नाहीत. पक्षाने लोकसभेच्या सगळ्या खासदारांसाठी व्हीप बजावला आहे. त्यांना उद्याच्या बैठकीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उद्या सगळे खासदार आले, तर मी त्या सहा खासदारांची जाहीर माफी मागेल. त्यात मला जराही कमीपणा वाटणार नाही, असे अंधारे यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर