ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचारच आजच्या तरुणाईला ऊर्जा देणारे:संपत बारस्कर यांचे प्रतिपादन, चौपाटी कारंजावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे केवळ एक नाव नसून ती प्रखर देशभक्तीची धगधगती मशाल आहे. महान स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, अद्वितीय लेखक आणि थोर समाजसुधारक असलेल्या सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सेल्युलर जेलमधील काळ्यापाण्याची अमानुष शिक्षा भोगली. त्यांची प्रखर देशभक्ती आणि असीम त्याग आजच्या प्रत्येक युवकाला राष्ट्रसेवेसाठी ऊर्जा आणि प्रेरणा देणारा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले. क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील चौपाटी कारंजा येथील सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते.बारस्कर यांनी सावरकरांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, सावरकरांच्या मनात बालपणापासूनच प्रखर राष्ट्रभक्तीची भावना होती. इंग्रज हुकूमशाहीविरुद्ध लढा उभारण्यासाठी त्यांनी शेकडो युवकांना एकत्र केले आणि ‘अभिनव भारत’ या क्रांतिकारी संघटनेची स्थापना करून देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला एक नवी आणि आक्रमक दिशा दिली. आजच्या नव्या पिढीने सावरकरांचे हे विचार, त्यांचा त्याग आणि राष्ट्रसेवेची भावना स्वतःमध्ये आत्मसात करणे काळाची गरज आहे. या कार्यक्रमादरम्यान नगरसेवक प्रकाश भागानगरे आणि नगरसेवक रवींद्र बारस्कर यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनप्रवासाला आणि आंदोलनाला उजाळा दिला. कार्यकर्त्यांनी दिलेल्या सावरकरांच्या जयघोषाने संपूर्ण चौपाटी कारंजा परिसर भक्तीमय आणि देशभक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेला होता. या अभिवादन सोहळ्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष सूरज कोतकर, कार्याध्यक्ष ऋषिकेश रासकर, रवी दंडी, आदिनाथ येडे, आनंद राठोड, मयूर जोशी, बाबू बारस्कर, संदीप गोसावी, अजिंक्य गुरव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील शेकडो युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर