ब्रेकिंग न्यूज
Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार
SP News Maregaon

मेळघाटच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक:संघर्ष यात्रेदरम्यान आश्वासनांची काय स्थिती? ग्रामस्थांकडून घेताहेत माहिती‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मेळघाटातील पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, रोजगार, वनहक्क आणि रस्त्यांच्या बिकट प्रश्नांसाठी दोन महिन्यांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी मेळघाट संघर्ष पदयात्रा काढली होती. मात्र, या पदयात्रेनंतरही मेळघाटातील अनेक मूलभूत प्रश्न अद्याप जसेच्या तसे कायम असल्याचा आरोप करत आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या संयुक्त जनसंपर्क अभियानांतर्गत शनिवारी त्यांनी धारणी व चिखलदरा तालुक्यातील विविध गावांचा दौरा करून नागरिकांशी थेट संवाद साधला. दरम्यान, मेळघाटातील समस्या तातडीने निकाली न निघाल्यास आगामी दिवाळीत तीव्र आंदोलन छेडण्याचा कडक इशारा आमदार कडू यांनी यावेळी दिला.मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या धारणी तालुक्यातील मोगर्दा आणि चिखलदरा तालुक्यातील गडगाभांडूम या गावांना भेट देऊन आमदार बच्चू कडू यांनी सर्वप्रथम ग्रामस्थांचे विशेष अभिनंदन केले. याप्रसंगी ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत करत पाणीपुरवठा, वीज, आरोग्य सेवा, शिक्षण, दळणवळणासाठी रस्ते आणि रोजगाराशी संबंधित भेडसावणाऱ्या अनेक गंभीर समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. काही महिन्यांपूर्वी काढलेल्या मेळघाट संघर्ष यात्रेदरम्यान समोर आलेल्या प्रश्नांची सद्यस्थिती काय आहे, प्रशासनाने त्यापैकी कोणती कामे प्रत्यक्ष पूर्ण केली, कोणते प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत आणि नागरिकांच्या इतर कोणत्या नव्या अडचणी आहेत, याची सविस्तर माहिती बच्चू कडू गावकऱ्यांशी चर्चा करून घेत आहेत. गडगाभांडूम येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू यांनी प्रशासकीय यंत्रणेवर जोरदार टीकास्त्र सोडले. “मेळघाट संघर्ष यात्रेनंतर आम्ही प्रशासनाला कामे करण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता. मात्र, प्रशासनाची अनेक कामे आजही केवळ कागदावरच मर्यादित आहेत. अधिकारी फक्त बैठकांचे सत्र घेतात, अहवाल पाठवतात; परंतु सर्वसामान्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्याची त्यांची इच्छाशक्ती अजिबात दिसत नाही. मेळघाटातील विकास रखडण्यास पूर्णपणे प्रशासनाची निष्क्रियताच कारणीभूत आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.या वेळी त्यांनी मेळघाटातील प्रलंबित वीज प्रश्नावरही तीव्र संताप व्यक्त केला. “देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली आहेत, देश प्रगतीच्या आणि तंत्रज्ञानाच्या नव्या उंचीवर पोहोचला आहे; मात्र अत्यंत खेदाची बाब म्हणजे मेळघाटातील काही गावे आजही अंधारात चाचपडत आहेत. अनेक वस्त्यांपर्यंत नियमित वीज पोहोचलेली नाही. हा विकासाचा प्रश्न नसून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा, अपयशाचा पुरावा आहे,” असे बच्चू कडू म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर