ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

आवक मंदावल्याने भाजीपाला दरात वाढ:वांगी, टोमॅटोसह पालक, मेथी, कोथिंबीर आदी पालेभाज्या झाल्या महाग‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पापरी जून महिना उजाडून २० दिवस उलटले तरी पावसाने काही हजेरी लावली नाही. शेतातील उभ्या फळबागा पिकांसह भाजीपाला व इतर तरकारी माळव्यालाही याचा फटका बसत आहे. ठोक बाजारात शेपू, मेथी, कोथिंबीर, पालक, चुका यासह अन्य पालेभाज्या तसेच वांगी, कोबी, टोमॅटो यांची ठोक बाजारात आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात सध्या पालेभाजांचे दर वाढले आहेत. जून महिन्यात पावसाची हजेरी लागताच पालेभाज्यांची आवक वाढते. त्यामुळे भाज्या स्वस्त होतात. यंदा मात्र पावसाने दडी दिली. त्यामुळे कूपनलिका, विहिरी यांची पाणी पातळी खालावली असल्याने अनेकांनी केलेली भाजीपाला पिके करपून गेली तर गत महिन्यात सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेले वादळीवारे पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर नियोजन करून केलेल्या भाजीपाला तरकारी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नूकसान झाले आहे. त्यामुळे सोलापूरसह पंढरपूर शहरातील भाजीपाला ठोक बाजारपेठेत विविध गावांतून पालेभाज्यांची तसेच वांगी, टोमॅटो, काकडी आदीची आवक मंदावल्यामुळे पालेभाज्यांचे दर महागले असल्याचे आठवडी बाजारातील भाजीपाला विक्रेत्यांकडून सांगण्यात येते आहे. देशी वांगी, टोमॅटो, काकडी, देशी गवार यांनी शंभरी गाठली आहे. कोणताही भाजीपाला घ्या तो ३० रुपयांस पावकिलो झाला आहे. किरकोळ बाजारात पालेभाजांचे सध्याचे दर ठोक बाजारात भाजी पाल्याची आवक घटली ^आम्ही पंढरपूर बाजारातून ठोक भाजीपाला खरेदी करून तो विविध गावच्या आठवडा बाजारात विकतो, गत काही दिवसांपासून ठोक बाजारात भाजीपाल्याची आवक घटली असून, तो वधारला आहे. मध्यंतरी झालेल्या वादळी वाऱ्याने तसेच पावसाने अनेक ठिकाणच्या भाजीपाल्याचे नुकसान झाले. त्यामुळे उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी झालीये. आम्हीही निम्म्यावरच खरेदी सुरू केली आहे. वांगी, टोमॅटो, काकडी यांनी शंभरी गाठलीय. -विजय पाखरे, कोन्हेरी, ता. मोहोळ पालक जुडी-२० रुपये, मेथी जुडी ३० रुपये, कोथिंबीर जुडी ४० रुपये, शेपू जुडी २५ रुपये, चुका जुडी- २५ रुपये, कोबी ३० रुपये, फ्लॉवर-४० रुपये, काकडी-१०० रुपये किलो, बटाटा-२५ रुपये, देशी वांगी-१०० रुपये किलो, कारले ८० रुपये किलो, शेवगा-२५ रुपयास ४ शेंगा,टोमॅटो-१०० किलो, दोडका – ७० रुपये किलो, देशी गवार-१२० रुपये किलो, पुणेरी गवार- १०० किलो.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर