ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

शाहू महाराजांचा मनोज जरांगेंना पाठींबा:म्हणाले – जरांगेंना कोल्हापूर पेक्षा हैदराबाद गॅझेट जवळचे वाटते; सरकारला दिला निर्वाणीचा इशारा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


काँग्रेस खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी शनिवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला. सर्व मराठे हे कुणबी आहेत आणि सर्व कुणबी हे मराठे आहेत. मनोज जरांगे पाटील व सरकार यांच्यात काय सुरू आहे हे आम्हाला माहिती आहे. पण सरकार मराठा समाजाकडे असेच दुर्लक्ष करत राहिले तर उद्रेक अटळ आहे, असे ते म्हणालेत. मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आंतरवाली सराटीत भर उन्हात उपोषण सुरू केले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आंदोलनस्थळी पोहोचलेत. पण जरांगे आपल्या आंदोलनापासून तसूभरही मागे हटले नाहीत. या पार्श्वभूमीवर खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठींबा देत सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय घेताना राज्य सरकारने सातारा गॅझेटसह कोल्हापूर गॅझेटचाही विचार करावा, अशी सूचना त्यांनी या प्रकरणी सरकारला केली आहे. मराठा समाजाकडे दुर्लक्ष झाले तर उद्रेक होईल शाहू महाराज पत्रकारांशी वार्तालाप करताना म्हणाले, राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर त्याचा उद्रेक होऊ शकतो. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे यांची भूमिका आक्रमकच असली पाहिजे. ते उन्हात बसलेत. आम्हीही उन्हात बसलोत. शेतकरी म्हटले की त्याला ऊन, पाऊस, वाऱ्याचा काहीही फरक पडत नाही. आता वाटाघाटीत काय निघते ते पाहू. त्यातून कळेल सरकार सीरियस आहे की नाही. जरांगे 8 वर्षांपासून आंदोलन करत आहेत. वाटाघाटी होत आहेत. पण काही ठरत नाही. मराठा समाजाची फसवणूक झाली आहे. त्यांना आतापर्यंत काहीच मिळाले नाही. जरांगे पाटील व सरकारमध्ये काय ठरत आहे किंवा काय घडत आहे हे आम्हाला माहिती नाही. या प्रकरणी वर्तमानपत्रात जे छापून येते, त्यातूनच माहिती मिळते. पण प्रत्यक्षात काय ठरतंय, कुठे घसरतंय, कुठे जमत नाही हे आम्हाला कोल्हापुरात कळत नाही. पण मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आमचा सुरुवातीपासूनच पाठींबा आहे. मराठा समाज यासंबंधी नेहमीच एकसंध राहील. कोल्हापूर गॅझेट लागू करण्यावरही विचार व्हावा शाहू महाराज म्हणाले, शासनाने या प्रकरणी कोल्हापूर गॅझेटचा विचार केला पाहिजे. त्या आधारावर आपला निर्णय घेतला पाहिजे. मनोज जरांगे ज्या भागात राहतात, तो भाग हैदराबाद संस्थानात होता. ते निजामाचे स्थान आहे. त्यामुळे जरांगेंना नैसर्गिकपणे तेथील आठवणे येते. इथली येत नाही. त्यांना कोल्हापूर गॅझेट लांबचे वाटते. हैदराबाद गॅझेट जवळचे वाटते. मराठा व कुणबी समाज हा एकच आहे. पूर्वीच्या काळात लढाईच्या काळात जाणाऱ्यांना मराठे असे म्हटले जायचे. लढाईहून परत आल्यानंतर हेच मराठे शेती करायचे म्हणून त्यांना कुणबी म्हटले जायचे. त्यामुळे सर्व कुणबी मराठे आहेत, असे शाहू महाराज म्हणाले. हे ही वाचा… उन्हाचे चटके, आश्वासनांचे फुगे अन् मराठा समाजाची घुसमट:आंदोलन, आश्वासन, माघार या चक्रव्यूहात अडकले मनोज जरांगे; समाजात संताप

मराठा आरक्षणाच्या लढ्याची कहाणी आता एखाद्या ठराविक पटकथेसारखी वाटू लागली आहे. पहिला अंक – मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन; दुसरा अंक – सरकारचे शिष्टमंडळ; तिसरा अंक – चर्चा व आश्वासन; चौथा अंक – आंदोलन मागे; आणि 5 वा अंक – पुन्हा तेच प्रश्न, तीच निराशा. हे चक्र इतक्या वेळा फिरले आहे की, आता मराठा समाजातील एक मोठा वर्ग निराश झाला आहे. सरकारवरच नव्हे, तर या संपूर्ण प्रक्रियेवर. आता पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी धगधगत आहे. मे महिन्याच्या कडक उन्हात जरांगे पाटील आंदोलनाला बसले आहेत. आपले शरीर थकले असले तरी इरादा कायम असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आणि इकडे राज्य सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा त्यांच्या आंदोलनस्थळी पोहोचले आहे. आता चर्चा होईल, आश्वासन मिळेल, जरांगे माघारी जातील असे गृहीत धरले जात आहे. पण यात पुन्हा एक प्रश्न उपस्थित होत आहे, तो म्हणजे यावेळी तरी काही वेगळे घडेल का? वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर