ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

पावसाकडे डोळे:मराठवाड्यातील 8 पैकी 7 जिल्ह्यांकडे पावसाची पाठ, विभागात आतापर्यंत सरासरीच्या 48.5 टक्के पाऊस

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जून महिना निम्मा उलटून गेल्यानंतरही मराठवाड्यात पावसाने हजेरी लावलेली नाही. धाराशिव वगळता उर्वरित मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केवळ १७.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात ७ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होते. त्यापूर्वी २५ मेनंतर रोहिणी नक्षत्रात पूर्व मोसमी पावसाच्या सरी हजेरी लावतात. त्यामुळे मराठवाड्यात पेरण्यांना सुरुवात होते. या वर्षी मात्र मराठवाड्यात अद्याप पावसाचे आगमन झालेले नाही. मराठवाड्याच्या सीमेवरील सोलापूर जिल्ह्यात मान्सून ८ जून रोजी दाखल झाला. त्यानंतर त्याची वाटचाल थांबलेली आहे. सोलापूर जिल्ह्यालगत असलेल्या धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंतच्या सरासरीएवढा पाऊस झाला. मात्र, उर्वरित मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा आहे. पेरण्या खोळंबल्या मराठवाड्यात पाऊस नसल्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. विभागात खरिपाचे २२ लाख ८१ हजार ८२१ हेक्टर क्षेत्र आहे. आतापर्यंत ६ हजार ७१३ हेक्टरवर पेरण्या झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. त्यापैकी ४ हजार ८२१ हेक्टर क्षेत्र कापसाचे आहे. गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या पंधरवड्याच्या शेवटी विभागात २४ हजार ७८६ हेक्टरवर पेरण्या केल्या होत्या. संभाजीनगर, जालना, परभणीत निम्म्यापेक्षा कमी पाऊस मराठवाड्यात २०२५मध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती. १९ जूनपर्यंत विभागात ६४.९ मिलिमीटर पाऊस पडला होता. सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ७६.४ टक्के होते. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत १०४ टक्के, तर धाराशिव जिल्ह्यात १०८.५ टक्के पाऊस पडला होता. जालना व लातूर जिल्ह्यांत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त, तर बीड, नांदेड जिल्ह्यांत ६० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची नोंद होती. परभणी जिल्ह्यांत सर्वात कमी ४५.७ टक्के पाऊस पडला होता. धाराशिव वगळता उर्वरित मराठवाड्यात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत उलट स्थिती आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर