ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

संविधानाला सुसंगत सध्याचे सरकार नाही:त्यांचे संविधानप्रेम नावापुरतेच; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोमटे यांचे परखड मत‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आज ज्या पद्धतीचे आणि विचाराचे सरकार देशात व वेगवेगळ्या राज्यांत आलेले आहे, ते संविधानाला सुसंगत नाही. ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वीपा सून संविधानाला रोखठोक विरोध केला, आज त्यांचे नाव घेतल्याशिवाय सत्तेचा मार्ग मोकळा होत नाही, म्हणूनच ते संविधानाचे नाव घेत आहेत. याचा अर्थ त्यांना संविधानाबद्दल खरे प्रेम आहे असे होत नाही,” असे परखड मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोमटे यांनी व्यक्त केले. येथील बडी साजन मंगल कार्यालयात ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ व ‘विवेक जागर संस्था’ यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय विस्तारित कार्यकारिणी बैठकीत शनिवारी सायंकाळी लक्षवेधी व शतकवीर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महाअंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास लोकशाही समाजवादी कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे, राज्य अध्यक्ष माधव बावगे, राज्य सल्लागार कॉ. बाबा आरगडे, ॲड. रंजना गवांदे, अंधश्रद्धा निर्मूलन’ पत्रिकेचे कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड आदी उपस्थित होते. लोमटे म्हणाले, समाजवादी, गांधीवादी, आंबेडकरवादी, मार्क्सवादी आणि संविधानवादी अशा विविध संघटना वेगवेगळ्या विचारांत विखुरल्या आहेत. अशा विखुरलेल्या अवस्थेत राहून आपण ज्या विचारांचा विरोध करत आहोत, तो करणे शक्य नाही. त्यामुळे समान उद्दिष्टांपर्यंत पोहोचायचे असेल तर सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकजूट टिकवली पाहिजे.” समाजात आणि कुटुंबात लोकशाही, समता, स्वातंत्र्य हे विचार खरोखर स्वीकारले गेले आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सद्यस्थितीवर बोट ठेवले. प्रा. सुभाष वारे म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्याला लाभलेल्या सामाजिक ऐक्याच्या आणि मुकुंदराव पाटलांच्या सत्यशोधकी चळवळीच्या वारशाचा गौरव केला. अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेमुळे आज ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिके’चे साडेसहा हजार अंक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आलेल्या या बैठकीच्या उत्कृष्ट नियोजनाचे अभिनंदन केले. या सोहळ्याला अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बुधवंत, कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड, उपाध्यक्ष प्रमोद भारुळे, जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा, सोशल मीडिया कार्यवाह सुखदेव फुलारी, नगर शहराध्यक्ष भारतभूषण भागवत, शहराध्यक्ष विनायक ताकपेरे, शहर प्रधान सचिव ठकाजी जगधने, सतीश केदार, भाऊसाहेब सावंत उपस्थित होते. सूत्रसंचालन राज्य सरचिटणीस आरती नाईक यांनी केले. आरक्षणावरून जाती-जातींमध्ये भांडणे “सध्या आरक्षणाच्या अनुषंगाने जाती-जातींमध्ये भांडणे लावली जात आहेत. आपण महापुरुषांची नावे घेतो, पण आपापसातच लढतो आहोत. शिल्लक असलेल्या भाकरीचे वाटे सत्ताधारी करत आहेत; मात्र टोपलीतील भाकरीची संख्या वाढल्याशिवाय कोणाचेच पोट भरणार नाही, हे कोणी लक्षात घेत नाही,” असे सांगत लोमटे यांनी सर्व पुढारी आणि गट-तटांना एकत्र करून यावर विचारमंथन घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर